ई-लिलावाव्दारे
मक्याची विक्री
जळगाव, दि. 5- केंद्र शासनाच्या किमान आधारभूत खरेदी
योजनेअंतर्गत जळगाव जिल्हयात खरीप हंगाम 2013-14 मध्ये खरेदी केलेल्या 2,10,259
क्विंटल मक्याची जाहीर ई-लिलावाव्दारे विक्री करण्यात येणार आहे. 11 डिसेंबर
पर्यंत सुरु राहणा-या या ई-लिलाव
प्रक्रियेत इच्छूकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
ई-लिलाव प्रक्रियेसाठी इच्छूक व्यक्ती,
खरेदीदार, कंपनी यांना डिजीटल स्वाक्षरी सर्टिफिकेट काढणे आवश्यक राहणार आहे. ज्या
खरेदीदारांनी संगणकीय नोंदणी केली असेल व लिलावामध्ये मका खरेदीसाठी आवश्यक इसारा रक्कम रु. अडीच हजार रुपयांचा जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या नावे देय असलेल्या
राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष 11 डिसेंबर 2014 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपावेतो किंवा
त्यापुर्वी कार्यालयात जमा केलेला असेल त्यांनाच ई-लिलाव पध्दतीमध्ये भाग घेता येणार
आहे.
सर्वोच्च ई-निविदा धारकास
पॅनकार्ड, मोबाईल नंबर, टिन नंबर (सर्टिफिकेट) रहिवासी पत्ता आदी कागदपत्रे लिलाव
प्रक्रिया संपताच जिल्हाधिकारी कार्यालय, (पुरवठा विभाग) जळगाव येथे दिनांक 15
डिसेंबर 2014 रोजी कार्यालयीन वेळेत सादर करावी लागणार आहेत. निविदेतील अटी व शर्ती http;/eauction.gov.in
या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या असून अधिक माहितीसाठी दूरध्वनी
क्र0257-2229708, 7745827385 , 8421219336 येथे संपर्क साधावा असे आवाहन,
जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी केले आहे.
* * * * * * * *
शासकीय वसतीगृहाच्या इमारतीसाठी
आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे आवाहन
जळगाव, दि. 5 :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय
यावलच्या अधिनस्त असलेल्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहासाठी जळगाव शहरात इमारत पाहिजे असून इच्छूकांनी
संपर्क साधावा,असे आवाहन प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी
केले आहे.
या वसतीगृहामध्ये 120 विद्यार्थी राहणार असून
त्यांना पुरेल इतकी सर्व सोयी - सुविधांनी युक्त असलेली इमारत या वसतीगृहासाठी लागणार आहे. सार्वजनिक
बांधकाम विभाग, जळगाव यांनी निश्चित केल्याप्रमाणे भाडे अदा केले जाणार असून
इच्छूकांनी यावलच्या एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प कार्यालयाशी किंवा
02585-261432 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment