प्रबोधनपर अहिराणी चित्रपटाला
प्रेक्षकांनी प्रतिसाद द्यावा
‘ओ तुनी माय’ या अहिराणी
चित्रपटाच्या प्रदर्शनप्रसंगी महसूलमंत्री एकनाथ खडसेंचे आवाहन
जळगाव,दि.13- सावकारी प्रथा, हगणदारी मुक्ती, हुंडा
यासारख्या सामाजिक विषयांबाबत जनजागृती करणारा ‘ओ तुनी माय’ या अहिराणी चित्रपटाला
प्रेक्षकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज येथे
केले.
येथील
नटवर मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या अहिराणी बोली भाषेतील
चित्रपटाच्या प्रदर्शनप्रसंगी ना.खडसे उपस्थित होते. ओ तुनी माय हा अहिराणी
भाषेतील पडद्यावर झळकणारा पहिलाच चित्रपट आहे. याप्रसंगी आ. सुरेश भोळे, आ.
गुरुमुख जगवाणी, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर,
चित्रपटाचे निर्माते विनोद चव्हाण, दिग्दर्शक दीपक शिवदे, कलाकार गितांजली ठाकरे,
रंजन खरोटे, अविनाश मोरे आदी याप्रसंगी उपस्थित होते.
चित्रपटाच्या
मध्यंतरात ना. खडसे यांनी कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रेक्षकांशी संवाद साधला. ते
म्हणाले की, अहिराणी खानदेशाची साधी, सोपी आणि गोड भाषा आहे. ही भाषा या
चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर जाईलच शिवाय सबटायटल टाकून हा चित्रपट
देशभरात जावा. या चित्रपटातून विविध प्रबोधनाचे विषय लोकांपुढे मनोरंजक पद्धतीने
मांडण्यात आले आहेत. दिग्दर्शक, लेखक, कलावंतांनी अत्यंत मेहनतीने तयार केलेल्या
या कलाकृतीला प्रेक्षकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी
शहरातील अनेक मान्यवर तसेच प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000
No comments:
Post a Comment