24 एप्रिल
मतदानाच्या दिवशी कामगारांना भरपगारी सुट्टी
जळगाव दिनांक 3 :- जळगाव जिल्हयात
दिनांक 24 एप्रिल 2014 गुरुवार रोजी होणा-या लोकसभा निवडणुकीत विविध
आस्थापनांमध्ये काम करणा-या कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दिनांक 28
मार्च 2014 च्या शासन परिपत्रकान्वये 24 एप्रिल 2014 रोजीची भरपगारी सुट्टी देणे
बंधनकारक करण्यात आलेले आहे.
दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल,
खाद्यगृहे, अन्नगृहे, नाटयगृहे व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच
माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपींग सेंटर्स, मॉल्स, रिटेलर्सच्या चालक, मालक यानी
शासन परिपत्रानुसार मतदनाचा हक्क बजावणीसाठी. भारत निवडणुक आयोगाच्या
निर्देशानुसार जळगाव जिल्हयात दिनांक 24 एप्रिल 2014 गुरुवार रोजी होणा-या लोकसभा
निवडणुकीत विविध आस्थापनांमध्ये काम करणा-या कामगारांना मतदानाचा हक्क
बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. मतदानाच्या दिवशी
कामगारांना सार्वजनिक सुट्टी देण्यात यावी असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त श्री.
जी. जे दाभाडे यांनी केले आहे.
* * * * * *
* *
मान्यता नसलेली वसतिगृहे
तात्काळ बंद करावे
जळगाव,
दिनांक, 3 :- दुर्लक्षित, अनाथ तसेच काळजी
व संरक्षणाची गरज असलेल्या मुलांकरीता निवासी संस्था वसतिगृह, अनाथ आश्रम,
बालगृहे, बालसदन आणि विशेष काळजी संरक्षणाची गरज असलेल्या मतीमंद तसेच
एचआयव्हीग्रस्त बालकांसाठी वसतिगृहे किंवा निवासी संस्था सुरु करावयाचे असल्यास
अनाथालये व इतर धर्मदाय गृहे ( पर्यवेक्षण व नियंत्रण) बाल न्याय (मुलांची काळजी व
संरक्षण) अधिनियम अन्वये मान्यता नोंदणी प्रमाणपत्र महिला व बाल विकास विभागाकडून
घेणे बंधनकारक आहे.
मान्यता नोंदणी प्रमाणपत्रशिवाय अशा मुलांमुलीसाठी निवासी संस्था चालविणे
हे बेकायदेशिर आहे. अनाथ निराधाराच्या नावे लोकांकडून बेकायदेशिरपणे देणग्या घेवून
फसवणुक करणे, अशा निवासी संस्थांच्या वसतिगृहामध्ये मुलांचे व्यापार करणे व अवैध
दत्तक घेणे, अनधिकृतपणे मुलांना ठेवणे याला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हयातील सर्व
पोलिस स्टेशन प्रमुखांना कळविण्यात आलेले आहे.
जिल्हयातील मुला-मुलींसाठी मान्यता, नोंदणी प्रमाणपत्र शिवाय निवासी संस्था
असल्यास त्यांनी सदरचे वसतिगृह, बालगृहे तात्काळ बंद करावे व बालकांना जिल्हयाच्या
बाल कल्याण समिती समोर निरीक्षणगृह , बालगृहे जळगाव येथे हजर करावे. मान्यता
प्राप्त संस्थामध्ये प्रवेश हा केवळ बाल कल्याण समिती यांच्यामार्फत दिला जातो.
अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जळगाव, मध्यवर्ती प्रशासकीय
इमारत, दुसरा मजला आकाशवाणी चौक जळगाव (
0257-2228828) येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालाविकास अधिकारी
यांनी केले आहे.
* * * * * *
* *
No comments:
Post a Comment