Friday, 7 March 2014

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदारयादीत नाव समाविष्ट करण्याची संधी : प्रांताधिकारी मनोज घोडे


निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार
 मतदारयादीत नाव समाविष्ट करण्याची संधी
: प्रांताधिकारी मनोज घोडे

            चाळीसगाव, दिनांक 07 मार्च :-  भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे नुकतीच मतदारयादी पुर्ननिरीक्षण मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात 1 जानेवारी, 2014 या अर्हता दिनांकावर आधारित एकुण मतदार  3,10,094 एवढे असुन त्यामध्ये पुरुष मतदार  1,66,707 तर 1,43,387 इतक्या महिला मतदार आहेत. मतदारयादी पुर्ननिरीक्षण कार्यक्रम 2013 मध्ये चाळीसगाव विधानसभा मतदार संघातून जे मतदार कायम स्थलांतरीत झालेले होते अथवा मयत झालेले होते त्यांची वगळणी करण्यात आलेली होती. तथापी वगळणी केलेले मतदार हे जर वगळणी नंतर पुन्हा चाळीसगाव मतदारसंघात सर्वसाधारण रहिवासासाठी आलेले असतील तर त्यांनी आपले नाव मतदार यादीत तपासून घ्यावे जर आपले नाव मतदार यादीत नसल्यास ते समाविष्ट करण्यासाठी रविवार दिनांक 09 मार्च, 2014 रोजी  फॉर्म नमुना नं.6 हा भरुन आपल्या स्थानिक केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बी.एल.ओ. यांचेकडे जमा करावे तसेच ज्या मतदारांचे मतदार यादीत नाव आहे परंतु छायाचित्र नाही अशा मतदारांनी आपले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र त्यामागे आपले संपुर्ण नाव, पत्ता व यादी भाग क्रमांक नमुद करुन संबंधित बी.एल.ओ. यांचेकडे जमा करण्याचे आवाहन प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.
            निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदाराचे वय दिनांक 01.01.2014 या अर्हता दिनांकास 18 वर्षे पुर्ण झालेले आहे अशा नवमतदारांनी देखील नमुना नं.6 हा फॉर्म भरून आपला मतदानाचा हक्क प्राप्त करून मतदारयादी अद्यावत करणेकामी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.


* * * * * * * *

No comments:

Post a Comment