Wednesday, 26 March 2014

मतदान म्हणजे एक पवित्र काम समजल्यास मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढणार : निवडणूक निरीक्षक व्ही.पलानी चामी


मतदान म्हणजे एक पवित्र काम समजल्यास
मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढणार
                                  : निवडणूक निरीक्षक व्ही.पलानी चामी

            चाळीसगाव, दिनांक 26 मार्च :-  चाळीसगांव तालुक्यातील विधानसभा मतदार संघात सन 2009 च्या निवडणूकीत सर्वात कमी मतदान झालेल्या एकूण 60 मतदान केंद्रावर लक्ष केंद्रीत करत थेट सदर केंद्रातील बी.एल.ओ. यांच्याशी  चर्चा करुन मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी  बी.एल.ओ. यांनी आपल्या स्तरावरुन आवश्यक त्या उपाययोजना केल्यास मतदानाची टक्केवारी वाढण्यास नक्कीच मदत होणार असल्याचे  निवडणूक निरीक्षक व्ही.पलानी चामी यांनी  मार्गदर्शन करतांना सांगितले.
            लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर आधारित निवडणूक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज बी.एल.ओ. तसेच कॅम्पस ॲम्बेसेडर यांच्याशी चर्चा करण्यासाठी निवडणूक निरीक्षकांसमवेत बैठकीचे आयोजन तहसिल कार्यालयात करण्यात आले होते यावेळी  सहा.प्रकल्प अधिकारी ए.व्ही.भोकरे, उप विभागीय अधिकारी मनोज घोडे , तहसिलदार बाबासाहेब गाढवे, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रकाश गायकवाड, पोलीस निरीक्षक संजय देशमुख, गट विकास अधिकारी मालती जाधव, नायब तहसिलदार नानासाहेब आगळे, सुर्यवंशी आदि उपस्थित होते.
            कॅम्पस ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केलेल्या महाविद्यालयातील तरुणांशी संवाद साधतांना  मार्गदर्शन करतांना निवडणूक निरीक्षक म्हणाले की, मतदारांमध्ये प्रामुख्याने युवा मतदार व महिला मतदार यांच्यामध्ये मतदानाबाबत उदासिनता दिसून येते तरी युवा मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सोशल मिडीयाचा पुरेपुर वापर करावा व मतदानाच्या दिवशी  मतदारांशी संवाद साधुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मनापासून प्रयत्न करावे. आपले मत हे अमुल्य आहे. आपल्या एका मताने लोकशाही बळकट होण्यासाठी मोठी मदत होणार असल्याची भावना मतदारांच्या मनात रुजवावी व प्रत्येक नागरिकांना मतदान म्हणजे पवित्र काम असे समजावून मतदानासाठी बाहेर पडण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करावे असेही श्री. चामी यांनी यावेळी सांगितले.
            मतदान केंद्र निहाय  आयोजित केलेल्या कॉर्नर सभांमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी  मतदानाचे महत्व पटविण्यासाठीच्या उपाय योजना सर्व बी.एल.ओ.ना समजावून सांगितल्या व सर्व बी.एल.ओ. यांनी ही केवळ एक डयुटी न समजता देशप्रेमाची भावना मनात ठेवून काम करावे व मतदानाची टक्केवारी वाढविण्यास मदत करण्याचे आवाहन केले.
            यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी ए.व्हि.भोकरे, प्राताधिकारी मनोज घोडे, तहसलिदार बाबासाहेब गाढवे यांनी मार्गदर्शन केले तर आभार नानासाहेब आगळे यांनी मानले.

                                           * * * * * * * *

No comments:

Post a Comment