बोदवड
प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस पदांची भरती
जळगाव, दि. 10 :- एकात्मिक बालविकास
सेवा योजना, बोदवड प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी केंद्रातील सेविका व मदतनीसांची
रिक्तपदे स्थानिक रहिवाशी (ग्रामीण) भागातील महिला उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले
आहेत.
रिक्तपद भरावाचा तपशिल पुढीलप्रमाणे
आहे. ग्रामपंचात बोदवड गाव बोदवड -अंगणवाडी सेविका 1, मदतनीस 3,कोल्हाडी -अंगणवाडी सेविका 1, मदतनीस 1,पळासखेडा तांडा -मिनी
अंगणवाडी सेविका 1, मुक्तळ - अंगणवाडी सेविका -1, मदतीनस -1, साळशिंग- मदतनीस -
1,शेळगे (चिखली) मिनी अंगणवाडी -1, बोरगाव - मिनी अंगणवाडी सेविका -1
अर्ज सादर करण्यासाठी अटी व शर्ती
पुढीलप्रमाणे - अर्जदाराचे वय दि. 31 जानेवारी 2014 रोजी 21 वर्ष पूर्ण ते 35
वर्षाचे दरम्यान असावे, अर्जदारास 2 अपत्याचे वर अपत्य नसावीत, तसे प्रतिज्ञापत्र
सादर करावे लागेल, महिला असावी, अर्जदार
स्थानिक रहीवाशी असावी. (ग्रामसेवकाचा दाखला आवश्यक), शैक्षणिक
पात्रता किमान दहावी पास ते उच्चत्तम,
मदतनीसासाठी किमान सातवी पास ते उच्चत्तम, अर्ज कार्यालयने वितरीत केलेला व विहीत
नमुन्यातील असावा, अर्जदार विधवा असल्यास गट विकास अधिकारी पंचायत समितीचा दाखला
असावा, विधवा व अनाथ उमेदवारास अतिरिक्त 7 गुण देण्यात येतील, जातीचा दाखला सक्षम
प्राधिका-याचा असावा ( एस. सी / एस. टी. / व्ही. जे. एन. टी / ओबीसी / एस. बी.
सी.), मागासवर्गीय उमेदवारास एससी व एसटी साठी 10 गुण, व्ही. जे. एन. टी. / ओबीसी
/ एस. बी. सी. साठी 3 अतिरिक्त गुण देण्यात येतील. अर्जदार शिक्षण शास्त्र पदविका
पात्र असल्यास प्रमाणपत्र व मार्कशिट जोडण्यात यावे. त्याचे अतिरिक्त 5 गुण
देण्यात येतील, अंगणवाडी सेविका व मदतनीस कामाचा दोन वर्ष व त्यापेक्षा जास्त
कालावधीचा अनुभव असल्यास सक्षम अधिका-याचा दाखला जोडण्यात यावा. अनुदानित वा खाजगी
संस्थंचा दाखला ग्राहय धरण्यात येणार नाही. रिक्तपदांमध्ये बदल होण्याची शक्यता
असल्यास तसा बदलाबाबत वा भरतीप्रक्रिया स्थगित करण्याबाबत अधिकार बालविकास प्रकल्प
अधिकारी यांना आहे. अर्ज विक्री दि. 7 फेब्रुवारी 2014 पासून 17 फेब्रुवारी 2014
पर्यंत असून अर्ज स्विकारण्याची मुदत दि. 18 फेब्रुवारी 2014 ते 28 फेब्रुवारी
2014 पर्यंत राहील. शासकीय सुटीचे दिवशी अर्ज विक्री व स्विकारणे बंद राहील. असे
बाल विकास अधिकारी, एकात्मिक बालविकास सेवा योजना बोदवड यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment