निवृत्तीवेतनधारकाचे
वेतन 3 मार्च रोजी
जळगाव, दि. 28 :- आयकर परिगणना करणे ,
हयातीचे दाखले संकलीत करणे आदि अतिरिक्त कामकाजामुळे कोषागारामार्फत निवृत्तीवेतन
घेणा-या राज्य निवृत्तीवेतनधारकांचे माहे फेब्रुवारी 2014 चे निवृत्ती वेतन 3
मार्च रोजी अदा करण्यात येईल असे जिल्हा कोषागर अधिकारी यांनी कळविले आहे.
*
* * * * * *
आत्मा अंतर्गत जिल्हयातील शेतक-याचे
फर्टिंगेशनचे प्रशिक्षण
जळगाव, दि. 28 :- जळगाव जिल्हयातील 750
शेतक-यांचे जैन इरिगेशन सिस्टीम लि. जळगाव येथे ठिबक सिंचनाव्दारे विद्राव्या
खतांचा वापर (फर्टीगेशन) या विषयावर दोन दिवसाचे प्रशिक्षण प्रशिक्षण आयोजित
करण्यात आले आहे
प्रशिक्षण कालावधी पुढीलप्रमाणे -
जळगाव, भुसावळ, मुक्तानगर, रावेर, यावल दिनांक 10 ते 11 मार्च,बोदवड, पाचोरा,
जामनेर, भडगाव, चाळीसगाव दिनांक 12 ते 13 मार्च, अमळनेर, पारोळा, धरणगाव, एरंडोल,
चोपडा दिनांक 14 ते 15 मार्च सदरील प्रशिक्षण सकाळी 9.00 ते संध्याकाळी 6.00
वाजेपर्यंत राहणार आहे. येण्या जाण्याचा
खर्च शेतक-यांना स्वत: करावयाचा असून शेतकरी लोकवाटा रुपये 40 प्रति शेतकरी राहणार
असून लोकवाटा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावयाचा आहे.
प्रति
तालुका 50 शेतकरी सदरील प्रशिक्षणासाठी निवडावयाचे आहेत. ज्या शेतक-यांना
प्रशिक्षणात सहभागी व्हायचे आहे त्यांनी तालुका कृषी अधिका-यांशी संपर्क साधुन
प्रशिक्षणाला उपस्थित राहता येईल. परस्पर प्रशिक्षणाला प्रवेश मिळणार नाही.
प्रशिक्षण स्थळी शेतक-यासाठी नास्ता,
दुपारचे जेवण व चहाची सोय करण्यात आली आहे.
तरी शेतकरी बांधवानी प्रशिक्षणाचा लाभ
घ्यावा असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) संभाजी ठाकूर यांनी केले आहे.
* * * * * * *
स्मार्टकार्ड
नोंदणी प्रमाणपत्र व अनुज्ञप्ती
सेवाकराची
वाढीव शुल्क आकारणी 1 मार्च पासून
जळगाव,
दिनांक 28 :- शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती स्मार्टकार्ड तसेच स्मार्टकार्ड
नोंदणी प्रमणापत्राबाबत दिनांक 15 फेब्रुवारी 2014 च्या शासन निर्णयानुसार वाढीव
शुल्क आकारणी केली असून त्याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे.
शिकाऊ अनुज्ञप्ती - मुळ शुल्क रुपये
30/- लागू सेवाकराचा दर 12.36, सेवाकर रक्कम रु 0.67/-, उमेदवारांनी देय शुल्क 31
रुपये.
पक्की अनुज्ञप्ती - मुळ शुल्क रुपये
200/-, लागू सेवाकराचा दर 12.36, सेवाकर रक्कम रु. 10.79, उमेदवारांनी देय शुल्क
211 रुपये
स्मार्टकार्ड नोंदणी प्रमाणपत्र - मुळ शुल्क रुपये
350/-, लागू सेवाकराचा दर 12.36, सेवाकर रक्कम रुपये 43.26, उमेदवारांनी देय शुल्क
394 रुपये
स्मार्टकार्ड नोंदणी प्रमापणत्र व अनुज्ञप्ती व सेवाकराची आकारणी शुल्क दि.
1 मार्च 2014 पासून अंमलात येत आहे.जनतेने व वाहन धारकांनी नोंद घ्यावी असे
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांनी कळविले आहे.
* * * * * * *
No comments:
Post a Comment