मुंबई, दि. 3 : व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी
विकास महामंडळ मर्यादित,
नाशिक यांनी केलेल्या मागणीनुसार खावटी कर्जवाटप योजनेंतर्गत सन 2012-13 या
वर्षाकरिता बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यातील सुधारित
लाभार्थी उद्दिष्टास शासनाने कार्योत्तर मंजुरी दिली आहे.
आदिवासी विकास महामंडळाने सदर
जिल्ह्यातील ग्रामीण विकास यंत्रणेकडून प्राप्त झालेल्या यादीतील लाभार्थ्यांची
तपासणी केली असता बरेचसे लाभार्थी बिगर आदिवासी आढळून आलेले आहेत. तसेच जिल्हा ग्रामीण विकास
यंत्रणेच्या यादीमध्ये तांत्रिक चुका झालेल्या आहेत. त्यामुळे उपरोक्त जिल्ह्यातील लाभार्थी
उद्दिष्ट पूर्ण करता येणे शक्य नसल्याने महामंडळाने सदर लाभार्थ्यांपैकी काही
लाभार्थी इतरत्र वर्ग केले आहेत. यास
कार्योत्तर मंजुरी मिळावी म्हणून
महामंडळाने शासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार शासनाने ही मंजुरी दिली आहे.
सुधारित लाभार्थी उद्दिष्ट आणि
जिल्हे पुढीलप्रमाणे आहेत:-
जिल्हा बीड लाभार्थी उद्दिष्ट -1129; उस्मानाबाद - 2683; लातूर - 1812; सोलापूर - 475; सातारा-
428; परभणी -
419; बुलढाणा - 10688; नाशिक -22483 ;
अहमदनगर -3717; पुणे - 1590;
यवतमाळ - 8500; वाशिम - 9390;
अकोला - 10768; नंदुरबार - 6260;
गडचिरोली - 4096; रत्नागिरी - 1581; सिंधुदुर्ग - 317; ठाणे – 11114
सदर शासन निर्णय महाराष्ट्र
शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याचा संकेताक
201210221610066824 असा आहे.
No comments:
Post a Comment