जळगांव, दि. 14 :- शेतकरी किंवा शेतमजुर
कुटुंबातील मुलींच्या विवाहाकरीता शुभमंगल सामुहीक / नोंदणीकृत विवाह योजना
शासनामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विवाहासाठी आवश्यक वस्तू खरेदी
करण्यासाठी प्रती जोडपे रुपये :- 10,000/- अनुदान दिले जाते. व सामुहीक विवाह
आयोजित करणा-या स्वयंसेवी संस्थेस प्रती जोडप्यामागे रुपये :- 2000/- एवढे
प्रोत्साहनात्मक अनुदान विवाहाचे आयोजन व विवाह नोदणी खर्च या करीता देण्यात येते.
सदर संस्थेने योजना राबवितांना 5 ते 100 वधू – वरांचा गट करणे आवश्यक आहे.
नोंदणीकृत विवाह करणा-या जोडप्यांनी तसेच नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थानी त्वरीत
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, दुसरा मजला, प्रशासकीय इमारत, आकाशवाणी
जवळ, फोन नं. 0257-2228828 जळगांव येथे संपर्क साधून विहीत नमुन्यात प्रस्ताव सादर
करावे असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जळगांव यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment