Wednesday, 25 April 2012

अपात्र ठरलेल्या शिधापत्रिका धारकांना फॉर्म भरण्याची अखेरची संधी : शशिकांत हदगल

चाळीसगांव दि.25 : तालुक्यातील सर्व बी.पी.एल., अंत्योदय, केशरी तसेच शुभ्र शिधापत्रिका धारक यांना जाहिर आवाहन करण्यात येते की, शासन परिपत्रकान्वये  राज्यातील सर्व शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी गतवर्षी मार्च-2011 ते जुन-2011 या कालावधीत शोध मोहिम राबविण्यात आली होती. त्याचप्रमाणे दिनांक 22.06.2011 च्या शासन परिपत्रकान्वये या मोहिमेस दिनांक 31.08.2011 पर्यंत मुदतवाढ देखील देण्यात आली होती. उपरोक्त कालावधीमध्ये ज्या शिधापत्रिका धारकांचे नुतणीकरण केल्यामुळे रद्द झालेल्या शिधापत्रिका धारक यांना पुन्हा शिधापत्रिका मिळणेसाठी शासनाकडील दिनांक 31 मार्च, 2012 अन्वये एक विशेष बाब म्हणून शेवटची संधी देण्यात आली आहे. सदर मोहिमेतंर्गत आपली शिधापत्रिका तपासणीसाठी दि 30.04.2012 चे आत तपासणी फॉर्म भरुन घेणे गरजेचे आहे. तपासणी फॉर्म भरतांना खालील प्रमाणे निवासासंबंधीचा किमान एक पुरावा फॉर्म सोबत सादर करावा सदर पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त जुना नसावा. यामध्ये घरभाडे पावती, घरपट्टी पावती, नजीकच्या महिन्यातील वीज बिल, चालू मतदार यादीची नक्कल, ओळखपत्राची प्रत, दुरध्वनी/मोबाईल बील, बँक पासबुक, शासन सिडको/ म्हाडा / सुधार प्रन्यास / स्थानिक स्वराज्य संस्थेचे घर वितरणाचे पत्र. यापैकी किमान एक पुरावा जोडणे आवश्यक असून सदर फॉर्म मधील कुटूंबात असलेले गॅस जोडणी बाबतचे हमीपत्र भरणे आवश्यक आहे. सदर मोहिमेतंर्गत तपासणी फॉर्म विहित नमुन्यात योग्य पुरावा जोडून फॉर्म मुदतीत तहसिल कार्यालयात जमा करावे असे आवाहन तहसिलदार शशिकांत हदगल यांनी एका प्रसिध्द्ी पत्रकान्वये केले आहे. सदर फॉर्म विहीत नमुन्यात, विहीत मुदतीत आवश्यक पुराव्यासह जमा केल्यास अथवा अपुर्ण माहिती भरल्यास आपणास देण्यात आलेली शिधापत्रिका अपात्र ठरविण्यात येईल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment