Friday, 23 May 2025

पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी शासनाचे सहकार्य

 पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी शासनाचे सहकार्य

                                       -वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे

 

मुंबई,दि. 23-  पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्रात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवरजालना शहरात पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्यात येत आहे .या स्मारकामुळे जालना शहर पर्यटन आणि सांस्कृतिक केंद्र म्हणूनही ओळखले जाईलया स्मारकासाठी शासनस्तरावर सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही  वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली.

 

जालना  शहरातील अंबड चौफुली परिसरात उभारण्यात येत असलेल्या राजमाता  पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाची  वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी पाहणी केली.  या प्रसंगी आमदार  नारायण कुचेभास्कर आबा दानवेबद्रीनाथ पठाडेभगवान मात्रेस्मारक समितीचे अध्यक्ष कपील दहेकरसचिव शांतीलाल बनसोडेकोषाध्यक्ष बाळासाहेब अबुजसदस्य तुकाराम कोल्हेएस. एस. दहेकरप्रा. गणेश गुंजाळसाहित्यिक पंडित तळेगावकर, श्री. कुरधनेश्री.काळे उपस्थित होते.

 

मंत्री संजय सावकारे म्हणालेजालना शहराचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा समृद्ध करणारे 24 फूट उंचीचे हे स्मारक देशातील सर्वात उंच पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक ठरणार असून वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारे आहे.  या स्मारकाच्या पार्श्वभूमीला ऐतिहासिक महेश्वर किल्ला आणि इंदूर राजवाड्याच्या संकल्पनेचा मिलाफ साधणारी 28 फूट उंच आणि 56 फूट रुंद दगडी भिंत उभारली जाणार आहे. ही भिंत स्मारकाचे विशेष आकर्षण ठरणारी आहे. या भव्य प्रकल्पासाठी व सुशोभीकरणासाठी  शासन सकारात्मक आहे.

 

स्मारक समितीचे अध्यक्ष कपील दहेकर म्हणाले, हे स्मारक  पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आणि त्यांच्या समाजसुधारणेच्या विचारांचा गौरव आहे. यामुळे जालना शहराचे सांस्कृतिक वैभव वाढेल आणि भावी पिढ्यांना प्रेरणा मिळेल.

No comments:

Post a Comment