Sunday, 11 September 2016

समाधान शिबीराचा चाळीसगाव पॅटर्न ठरेल आदर्शवत :आमदार उन्मेश पाटील


समाधान शिबीराचा चाळीसगाव पॅटर्न ठरेल आदर्शवत
                                                         :आमदार उन्मेश पाटील

चाळीसगाव दि. 11 (उमाका वृत्तसेवा) :  चाळीगावात जुलै महिन्यात आयोजीत भव्य अशा समाधान शिबीरात महसूल प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणात दाखले वाटप करण्यात आले होते. समाधान शिबीराचा चाळीसगाव पॅटर्न हा राज्यभर आदर्शवत ठरेल असा विश्वास तालुक्याचे आमदार उन्मेशदादा पाटील यांनी आज व्यक्त केला. चाळीसगावातील यशस्वी शिबीराची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या खामगाव महसूल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना आमदार श्री.पाटील बोलत होते.
            जुलै महिन्यात आमदार उन्मेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव येथे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील व जलसंपदामंत्री ना.गिरिषभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या भव्य समाधान शिबिरात महसूल प्रशासनामार्फत 71 हजार दाखल्यांचे वाटप करण्यात आले होते. या शिबीरामध्ये 67 प्रकारच्या विविध योजनांचाही समावेश करण्यात आला होता. या यशस्वी शिबीराची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात होत असून यामाध्यमातून शासन आपल्या दारी ही अभिनव संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून राबविण्यात आली आहे. या समाधान शिबिराची दखल घेत संपूर्ण राज्यभरात या शिबिरासारखे मोठे शिबिर तालुकास्तरावर आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
त्याअनुषगाने समाधान शिबिराची माहिती जाणून घेण्यासाठी राज्याचे कृषिमंत्री ना.पांडुरंगजी फुंडकर व खामगाव मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांच्या सूचनेवरून खामगावचे प्रांताधिकारी श्री.बंडे व तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी महसूल प्रशासनासह आमदार उन्मेशदादा पाटील यांची भेट घेतली. यावेळी तहसिलदार कैलास देवरे, नायब तहसिलदार विशाल सोनवणे व नानासाहेब आगळे आदी उपस्थित होते. लोकाभिमुख आणि गतिमान शासन-प्रशासन जनतेच्या हितासाठी राबविणे यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचा समन्वय अत्यंत गरजेचा असून क्रियाशील कार्यकर्ते यांच्या मेहनतीनेच शिबिर यशस्वी करू शकलो अशी भावना यावेळी आमदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी तहसिलदार कैलास देवरे म्हणाले, चाळीसगाव येथे भरविण्यात आलेल्या भव्य अशा समाधान शिबीराची राज्यभरातुन माहिती मागविली जात आहे. राज्याला पथदर्शी ठरेल अशा उपक्रमांसाठी आमचे महसूल प्रशासन सदैव तयार असल्याचा विश्वास त्यांनी खामगाव येथून आलेल्या अधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला.
* * * * * * * *

No comments:

Post a Comment