कुष्ठरोग जनजागरण मोहिमेचा लाभ घ्यावा : डॉ.प्रमोद सोनवणे
चाळीसगांव, दिनांक 07 :- जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ.निमगुडे व सहाय्यक संचालक (आरोग्य) जळगाव डॉ. संजय चव्हाण
यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव तालुक्यात दिनांक ३ ते १७ ऑक्टोंबर २०१५ या
कालावधीत कृष्ठरोग जनजागरण मोहिम राबविली जात आहे, या मोहिमेचा शुभारंभ दि.२
ऑक्टोंबर,२०१५ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने
संपन्न झाला. या अभियानात शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी, निबंधस्पर्धा व कुष्ठरोगाबाबत प्रश्नमंजुशा तसेच समाजातील लोक
प्रतिनिधी व मान्यवरांना कुष्ठरोगाबाबत माहिती देवून त्यांच्या सहकार्याने या कुष्ठरोगाबाबत
समाजात असलेला गैरसमज दुर करण्यासाठी प्रसार माध्यमांद्वारे प्रचार करणे, रोग
निदान शिबीरांचे आयोजन करणे इत्यादी कार्यक्रमाद्वारे जनजागरण मोहिम राबविणार
असल्याने तालुक्यातील सर्व संबंधितांनी या शिबीरांचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका
आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे यांनी केले आहे.
या
मोहिमेदरम्यान आज दिनांक ०७ ऑक्टोंबर, २०१५ रोजी तालुक्यातील वडाळा-वडाळी
येथील ३५ वर्षीय महिला उपचारासाठी येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात आल्या
असता येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रमोद सोनवणे, कुष्ठरोग तंत्रज्ञ डॉ.हमीद
पठाण यांनी त्यांची आरोग्य तपासणी केली, तर रुग्णास कुष्ठरोग सांसर्गिक असल्याचा
संशय आल्याने तात्काळ उपचार सुरु करण्यात आले. तालुक्यातुन कुष्ठरोगाचे समुळ
उच्चाटन करण्याचा मानस असल्याने तालुक्यातील सर्व संबंधित नागरिकांनी आरोग्य
केंद्रात व आयोजित करण्यात आलेल्या शिबीरात जाऊन तपासणी व उपचार करुन घ्यावेत व
कुष्ठरोग जनजागरण मोहिम यशस्वी करावी असे आवाहनही डॉ.सोनवणे यांनी केले आहे.
* * * * * * * *
चाळीसगाव येथे 9 ऑक्टोंबरला
कँसर निदान कार्यशाळेचे आयोजन
चाळीसगांव, दिनांक 07 :-
स्व.चंदीराम बजाज हॉल सिन्धी कॉलनी स्टेशन रोड, चाळीसगाव येथे शुक्रवार दिनांक
९ ऑक्टोंबर २०१५ रोजी कँसर तज्ञ डॉ.निलेश चांडक, जळगांव हे कँसर निदान जनजागृती
कार्यक्रमास मार्गदर्शन करणार आहेत. सदर कँसर निदान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चाळीसगावचे
आमदार श्री.उन्मेश पाटील यांना निमंत्रीत करण्यात आले असून कार्यक्रमास पंचायत
समिती सभापती सौ.आशालता साळुंखे, उप सभापती लताताई दौंड तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांचेसह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शामसुंदर निमगडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ.जे.जे.मोरे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी चाळीसगाव तालुक्यातील सर्व
वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांनी
द्वीतीय वैदयकीय अधिकायांवर ओ.पी.डी. ची जबाबदारी सोपवून आपल्या कार्यक्षेत्रातील
आशा स्वयंसेवीका, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका व सहाय्यकांना शुक्रवार दिनांक ९ ऑक्टोंबर २०१५ रोजी सकाळी ०९:००
वाजता उपस्थित राहण्याच्या सुचना देवून
आपणही स्वत: वेळेवर उपस्थित रहाण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी चाळीसगाव यांनी
एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे
* * * * * * * *
No comments:
Post a Comment