Friday, 9 January 2015

शिवार रस्ते मोकळे करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा : प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील


शिवार रस्ते मोकळे करण्यासाठी
लोकसहभाग महत्वाचा !
                                                       :प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील

चाळीसगांव,दिनांक 9:- सुवर्ण जयंती राजस्व अभियानातंर्गत लोकसहभागातून शिवार रस्ते मोकळे करण्याची मोहिम राबविण्यात येत असून शिवार रस्ते मोकळे करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा असून शेतक-यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.
तालुक्यातील पातोंडा येथील अतिक्रमीत बैलगाडी रस्त्याची समस्या घेऊन शेतकरी राजेंद्र विसपुते, जगदिश हरी चौधरी, रामदास विठ्ठल वाणी, संजय दगडु माळी, जिभाऊ धर्मराज पाटील तालुका प्रशासनाकडे आले असता प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील व तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शेतक-यांसमवेत रस्ता मोकळा करणेबाबत चर्चा केली व एकमताने लोकवर्गणी गोळा करुन श्रमदानातून अतिक्रमीत रस्ता मोकळा करण्यात आला. अतिक्रमीत  रस्ता मोकळा केल्यामुळे याचा लाभ परिसरातील एकूण 25 शेतक-यांना होणार आहे. सदर अतिक्रमीत रस्ता मोकळा करतेवेळी सरपंच जिभाऊ धर्मराज पाटील, अनिल चुडामण काळे, संजय संतोष पाटील, वामन अर्जुन माळी, रघुनाथ हरी चौधरी, भास्कर दशरथ पाटील, तलाठी बी.ए.चव्हाण, मंडळ अधिकारी ए.जे.निकुंभ व ग्रामस्थ उपस्थित होते
सुवर्ण जयंती राजस्व अभियान राबवितांना लोक सहभागातून शिवार रस्ते मोकळे करण्यासाठी ‍तालुका प्रशासनातर्फे मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश शेतक-यांना जाण्यायेण्यासाठी सुयोग्य रस्ता उपलब्ध करुन देणे असून ब-याच शेतक-यांना इच्छा असूनही उस, केळी, फळबाग, भाजीपाला यासारखी नगदी पिके शेतरस्ता उपलब्ध नसल्यामुळे घेता येत नाही. बैलगाडी किंवा इतर वाहने अतिक्रमीत रस्त्यावरुन जावू शकत नसल्यामुळे पावसाळयात पेरणी वेळेवर होऊ शकत नाही. आंतर मशागतीसाठी आवश्यक अवजारांची ने-आण करणे कठीण होते. शेतमाल तात्काळ बाजारपेठेपर्यंत पोहोचवणे शेतरस्त्याअभावी जिकरीचे होते. शेतरस्त्याअभावी काढणी, कापणी यंत्रे शेतापर्यंत घेऊन जाणे शक्य होत नाही. या सर्व समस्या लक्षात घेऊन शेतरस्ते, शिवार रस्ते मोकळे करण्यासाठी शेतक-यांनी या मोहिमेत अधिकाधिक सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रातांधिकारी मनोज घोडे पाटील यांनी केले आहे.
विभागीय आयुक्त एकनाथ डवले व जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहिम राबविण्यात येत असून तालुक्यातूनही या मोहिमेला चांगला प्रतीसाद मिळत असल्याची प्रतीक्रिया प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांनी दिली. तालुक्यातील कोदगांव  शिवरस्ता लांबी 0.700 कि.मी. , अलवाडी शिवार रस्ता लांबी 1.500 कि.मी. तर तामसवाडी  शिवार रस्ता लांबी 0.750 कि.मी. या तीनही  शिवार रस्त्यांचे लोकार्पण करण्यात आले  असून सिंचन सुविधा वाढवण्यासाठी अनेक ठिकाणी तलाव, कालवे निर्माण झाले. यामुळे पारंपारिक रस्ते बुडीत क्षेत्रात गेल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न उदभवले, यासाठी पर्यायी सोय म्हणून अतिक्रमीत शेतरस्ते मुक्त करण्याची आवश्यकता भासू लागली. काही गावांच्या पुनर्वसनामुळे गावठाण बदलले. त्यामुळे पूर्वीच्या गावठाणातून शेताकडे जाणारे रस्त्यांची समस्या निर्माण झाली. अतिक्रमीत रस्त्यांमुळे प्रशासनात आणि न्यायालयात अनेक वाद आणि दावे दाखल होत गेले. हे सर्व प्रश्न आणि समस्या या मोहिमेमुळे संपुष्टात येतील तरी या ‍मोहिमेचा अधिकाधीक शेतक-यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.



* * * * * * * *

4 comments:

  1. अभिनंदन.
    विकासासाठी उत्तम कार्य केले.

    ReplyDelete
  2. अभिनंदन.
    विकासासाठी उत्तम कार्य केले.

    ReplyDelete
  3. सुवर्ण जंयती राजस्व अभियानांतर्गत शेतरस्ता तयार करणे साठी
    कोठे संपर्क करावे क्रुपया माहिती द्यावी.

    ReplyDelete
  4. सुवर्ण जंयती राजस्व अभियानांतर्गत शेतरस्ता तयार करणे साठी
    कोठे संपर्क करावे क्रुपया माहिती द्यावी.

    ReplyDelete