मतभेद बाजूला ठेवून योजना प्रभावीपणे राबवा !
:आमदार
उन्मेश पाटील
चाळीसगांव,दिनांक 2:- महात्मागांधी राष्ट्रीय
ग्रामीण रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागाचा चेहरा-मोहरा बदलविणारी परिसस्पर्शी योजना
असून आप-आपसातील मतभेद बाजूला ठेवून योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना आमदार
उन्मेश पाटील यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. शहरातील राजपुत मंगल कार्यालयात
आयोजीत महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेच्या कृती आराखडा आढावा बैठकीत ते
बोलत होते. यावेळी प.स.सदस्य सतिष पाटे, न.पा.विरोधी पक्षनेते राजेंद्र चौधरी,
तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, माजी प.स.सभापती संजय पाटील,जि.प.सदस्य प्रभाकर जाधव,
तहसिलदार बाबासाहेब गाढवे, गटविकास अधिकारी मालती जाधव, सहाय्यक गट विकास अधिकारी
सुरेश नरवाडे यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक मोठया संख्येने
उपस्थित होते.
योजना
राबवितांना गावातील प्रथम नागरिक या नात्याने सरपंच व प्रशासनामध्ये समन्वय
साधल्यास त्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकते. गारपिट, अवकाळी पाऊस अशा
नैसर्गीक आपत्तीमुळे शेतकरी पोळला जातोय यावर उपाय करण्यासाठी पर्यावरणाचा समतोल
राखणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवडीला या योजनेतुन
प्राधान्य देऊन बिहार पॅटर्न राबविण्यात यावा, नाला खोलीकरण, रुदीकरणातुन
जलसंधारणाची कामे हाती घेण्यात यावी, फळबाग लागवड, शिवार रस्ते, जलपुर्नभरण, रस्ते
विकास या सारखी विविध कामे या योजनेतुन करता येत असल्याने ही योजना प्रभावीपणे
राबवून मॉडेल व्हिलेज तयार करण्याच्या सुचनाही आमदार पाटील यांनी प्रशासनाला
दिल्या. योजनेचा कृती आराखडा तयार करण्याकामी तात्काळ शिवार फेरींचे आयोजन करुन
प्रत्येक गावातील शिवार फेरींना स्वत: उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी यावेळी
सांगितले.
योजनेचा
कृती आराखडा तयार करण्याकामी प्रथमच सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवकांसह
तालुका प्रशासनातील सर्व कार्यालय प्रमुखांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली
होती. यामुळे गांवपातळीवरील समस्या व त्यावरील उपाययोजनांविषयी मोठया प्रमाणात
उवापोह झाला. सरपंचानी मोठया प्रमाणात अडचणी व समस्या मांडल्या त्यावर तात्काळ
अमंलबजावणी करण्याच्या सुचना आमदारांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. मनरेगा योजना
राबविण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचात स्तरावर एक ग्रामीण रोजगार सेवकाची नेमणूक
करण्याची तरतूद असतांना तालुक्यातील एकूण
३५ ग्रामपंचायतींवर अशा सेवकांची नेमणूक नसल्याने आमदारांनी खेद व्यक्त करुन योजना
राबविणा-या प्रत्येक कार्यालय प्रमुखांकडून आढावा घेतला. शेतक-यास केंद्रबिंदु माणून योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सुचनाही
आमदार पाटील यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. मागील सर्व मतभेद बाजूला सारून
तालुक्यातून सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी व जिल्हयात आदर्श तालुका म्हणून
ओळख निर्माण करावी यासाठी मी सर्वोतोपरी
प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देखील आमदारांनी यावेळी उपस्थितांना देऊन या
योजनेचा दरमहा आढावा घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हगणदारीमुक्ती साठी
सर्वांना दिली शपथ
निर्मलग्राम अभियानातंर्गत
तालुक्यात हगणदारी मुक्तीची प्रभावी अंमलबजावणी केल्यास स्वच्छ भारतासोबत स्वस्थ
भारताचे स्वप्न पुर्ण होऊ शकते. येत्या 15 ऑगस्ट, 2015 पर्यंत रोगराई टाळण्यासाठी
तालुका शंभर टक्के हगणदारी मुक्त करण्याचा संकल्प करुन सर्व उपस्थितांना योवळी
स्वच्छतेची शपथही देण्यात आली.
तालुका
प्रशासनानेही गंभीर दखल घेऊन तात्काळ बैठकीचे केले आयोजन
महात्मागांधी राष्ट्रीय
ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या आढावा बैठकीत मोठया प्रमाणात आलेल्या तक्रारींची
तालुका प्रशासनाने दखल घेऊन या योजनेचे गट कार्यक्रम अधिकारी तथा तहसिलदार यांनी
आजच आढावा बैठकीनंतर प्रशासनाची बैठक आयोजीत केली. तालुक्यातील सर्व ग्रामसेवकांसह
सर्व कार्यालय प्रमुख या आढावा बैठकीस उपस्थित असल्याने व आढावा बैठकीतील गंभीर
बाबींची दखल घेऊन उद्या घेण्यात येणारी बैठक आजच घेण्याचे ठरवले. या बैठकीत आमदार
उन्मेश पाटील यांचे मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे
गावनिहाय आढावा घेऊन तात्काळ शिवार फेरींचे आयोजन करण्यात आल्याचे तहसिलदार
बाबासाहेब गाढवे व गटविकास अधिकारी मालती जाधव यांनी कळविले आहे.
या
आढावा बैठकीचे सुत्रसंचलन ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष संजिव निकम यांनी केले तर
तहसिलदार बाबासाहेब गाढवे, गटविकास अधिकारी मालती जाधव, जि.प.सदस्य प्रभाकर जाधव
यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली. या कार्यक्रमास जि.प.सदस्या विमलताई पाटील,
प.स.सदस्य संभाजी पाटील, धनंजय मांडोळे, सतिष अहिरे, जगन्नाथ महाजन, बाजार समितीचे
संचालक सरदारसिंग राजपुत, जामद्याचे सरपंच तथा जेष्ठ नागरिक ठाणसिंग राजपुत
यांच्यासह तालुक्यातील विविध कार्यालयाचे प्रमुख, सरपंच, जिल्हा परिषद व पंचायत समिती
सदस्य आदि मोठया संख्येने उपस्थित होते.
*
* * * * * * *
No comments:
Post a Comment