वाचन संस्कृती जोपासण्याकामी
ग्रंथ चळवळीचे मोठे योगदान !
:आमदार
उन्मेश पाटील
चाळीसगांव,दिनांक 4:-
वाचन संस्कृती जोपासण्याकामी ग्रंथ
चळवळीचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादन आमदार उन्मेश पाटील यांनी केले. शहरातील
ब्राम्हण सभागृहात जळगांव जिल्हा ग्रंथालय संघ व नाशिक विभागीय ग्रंथालय संघाच्या
16 व्या विभागीय अधिवेशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे
अध्यक्ष भिकनराव गायकवाड, भाजपाचे तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, नगर परिषदेचे
विरोधी पक्षनेता राजेंद्र चौधरी, बाबा चंद्रात्रे, ग्रंथ मित्र आण्णा धुमाळ, प्रा.एन.जे.पाटील,
अनिल अत्रे, प्रा.ल.वि.पाठक, सहा.ग्रंथालय संचालक नाशिक अ.द.येवले कला महर्षी केकी
मूस प्रतिष्ठानचे कमलाकर सामंत, अण्णा घुले आदी उपस्थित होते.
ग्रंथालये
ही केवळ उत्पन्नाचे साधन न मानता ग्रंथालयाच्या माध्यमातुन सज्जन शक्ती उभी
करण्याची मोठी जबाबदारी ओळखावी, ग्रंथालय चळवळीत संघटना व एकजुटीला मोठे महत्व आहे
आणि अशा अधिवेशनातुनच ग्रंथालयांना येणा-या अडचणी, समस्या, व्यथा यावर सखोल चर्चा
होऊन योग्य दिशा मिळत असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले. गाव तेथे
ग्रंथालय उभारण्याकामी महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत राजीव
गांधी भवन उभारण्याचा शासनाचा प्रस्ताव असून राजीव गांधी भवनामध्ये नाममात्र भाडे
आकारुन ग्रंथालयांना चांगली जागा उपलब्ध होऊ शकते यासाठी अधिवेशनात ठराव करण्याची
संकल्पनाही आमदार पाटील यांनी उपस्थितांना दिली.
कलामहर्षी
केकी मूस प्रतिष्ठान संचलित आशिर्वाद सार्वजानिक वाचनालय, चाळीसगांव यांच्या
सहकार्याने आयोजित नाशिक ग्रंथालय संघ व जळगांव जिल्हा ग्रंथालय संघाच्या 16 व्या
अधिवेशनाच्या कार्यक्रमास समाजाचे सक्रीय बुध्दीजीवी घटक या नात्याने चळवळीला
आमदार पाटील यांनी शुभेच्छा दिल्या व शासन दरबारी असलेल्या आपल्या प्रस्तावाला
न्याय मिळवून देण्याचे आश्वासनही दिले.
ग्रंथमित्रांना
ओळखपत्र, एस.टी.प्रवास सवलत, विश्रामगृहांचे आरक्षण, व मानधनात वाढ यासारख्या
सुविधा शासन स्तरावरुन उपलब्ध करुन देण्याबरोबर निर्वाह वेतन मंजूर करण्याचे तसेच
तीन वर्षापासून नवीन ग्रंथालयांच्या मान्यतेला असलेली बंदी उठवावी असे आवाहन नाशिक
विभाग ग्रंथालय संघाचे कार्यवाहक एन.जे.पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपन भाषणातून
केले.
यावेळी
कै.ॲड.दत्ता गवांदे स्मृती पुरस्कार देऊन ग्रंथमित्रांना सन्मानीत करण्यात आले.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कमलाकर सामंत,
बुरहन घुले व ग्रंथमित्र अण्णा धुमाळ यांचे सहकार्य मिळाले
लोकराज्य स्टॉलला
आमदारांनी दिली भेट
माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाच्या वतीने उप माहिती कार्यालय, चाळीसगांव या कार्यालयाने या अधिवेशनाच्या
कार्यक्रमात शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिकाचा स्टॉल लाऊन उपस्थितांना
त्याच ठिकाणी लोकराज्य मासिकाचे वार्षीक सभासद होण्याची सोय उपलब्ध करुन दिली
होती. या स्टॉलला आमदार उन्मेश पाटील यांनी भेट दिली व प्रथम लोकराज्य सभासद होऊन
शुभारंभही केला. लोकराज्य मासिकाची वार्षीक वर्गणी भरण्याकामी आता उप माहिती
कार्यालय, छाया निवास, पहिला मजला, स्टेट बँक इमारत, भडगांव रोड, चाळीसगांव येथेही
सोय उपलब्ध असून तालुक्यातील नागरिकांनी या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा असे
आवाहन प्रभारी माहिती सहाय्यक मनोहर पाटील यांनी केले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment