Tuesday, 6 January 2015

बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचे आचरण करा:आमदार उन्मेश पाटील


बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचे आचरण करा
                                                              :आमदार उन्मेश पाटील

                चाळीसगांव,दिनांक 6:- केवळ हार तुरे वाहुन चालणार नाही तर आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचे आचरण केल्यास ख-या अर्थाने पत्रकारदिन साजरा केल्याचे सार्थक होईल असे प्रतिपादन आमदार उन्मेश पाटील यांनी पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात केले. कै.वनजीबाबा ग्रामीण विकास मंडळाच्या सभागृहात आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
            यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ए.ओ.पाटील, पत्रकार एम.बी.पाटील, बी.ए.पाटील, मोतीलाल अहिरे, आर.डी.चौधरी, मुराद पटेल, देवीदास पाटील, संजय सोनार, दिनेश पाठक आदी उपस्थित होते.
            महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक, पहिले मराठी वृत्तपत्र दर्पणचे संपादक, ज्ञानेश्वरीचे आद्य प्रकाशक आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आमदार पाटील म्हणाले की, वयाच्या २० व्या वर्षी बाळशास्त्री जांभेकरांनी ब्रिटीश राजवटीमध्ये मराठी पत्रकारिता दर्पण या वृत्तपत्राच्या माध्यमातुन उदयास आणली. सार्वजानिक वाचनालयांची स्थापना, संशोधक व बुध्दीजीवी व्यक्तीमत्व,  1845 मध्ये ज्ञानेश्वरीचे आद्य प्रकाशक, भारतासह महाराष्ट्राच्या उज्वल भवितव्यासाठी स्वत:ला वाहुन घेतलेले समाजसुधारक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचे प्रत्यक्षात आचरण केल्यास ख-या अर्थाने पत्रकार दिन साजरा केल्याचा आनंद होईल असेही आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले.
            लोकशाहीमध्ये पत्रकारितेला चौथा आधास्तंभ म्हणून संबोधले जाते. त्या अनुषंगाने  समाजाचा आरसा म्हणून पत्रकारांची भुमीका महत्वाची लक्षात घेता तालुक्यातील विकास कामाविषयी जागरुक पत्रकार या नात्याने विकास कामांबाबत योग्य त्या सुचना  करण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले तर अशा सुचनांचे स्वागत करण्यात येऊन तालुक्याच्या विकास कामांना गती मिळू शकते. असेही आमदार पाटील यावेळी म्हणाले. तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या, पत्रकारांसाठी हक्काचे घरकुल उभारण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यानी उपस्थित पत्रकारांना दिले.
            यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष  ए.ओ.पाटील यांनी मनोगत व्यक्त केले तर पत्रकार मोतीलाल अहिरे व पत्रकार आर.डी.चौधरी यांनी तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार उन्मेश पाटील यांना आवाहन केले. यावेळी आमदार उन्मेश पाटील यांनी सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रस्तावना विजय पांगारे यांनी केले. या कार्यक्रमास प्रभारी माहिती सहाय्यक मनोहर पाटील, माहिती कार्यालयाचे लिपीक रामकृष्ण कोळी, जयसिंग गायकवाड यांच्यासह तालुक्यातील पत्रकार जिजाबराव वाघ, सुर्यकांत कदम, रामलाल चौधरी, सुनिल राजपुत, निलेश परदेशी, रमेश जानराव, गणेश पवार, मनोज पाटील, संजीव पाटील, निंबाजी सोनार, ब्राम्हणकर, गोरख गोफणे, प्रशांत गायकवाड, स्वप्नील वडनेरे, मनोहर कांडेलकर, छोटुलाल बोरसे, उमेश बर्गे, भिकन वाणी, सुनिल पाटील, कुणाल कुमावत, मुकेश पवार, योगेश मोरे, जाकिर मिर्झा, राकेश निकम, बापु शिंदे, सुहास भावसार, योगेश पाटील यांच्यासह ग्रामीण पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते


* * * * * * * *

No comments:

Post a Comment