महाराष्ट्र केसरी विजय चौधरींचा
पालकमंत्र्यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार
चाळीसगाव,दिनांक 17:-
चाळीसगाव तालुक्याचे नावलौकीक वाढविणारा
सायगावच्या मातीत जन्मलेला विजय चौधरी याने महाराष्ट्र केसरी वर न थांबता हिंद
केसरी होण्याची इच्छा व्यक्त करत त्यासाठी संपुर्ण पाठबळ देऊन दत्तक घेण्याची
घोषणा राज्याचे महसूल मंत्री तथा
जिल्हयाचे पालकमंत्री ना.एकनाथराव खडसे यांनी आज केली. सायगावचा महाराष्ट्र केसरी किताब पटकविणा-या
विजय चौधरी याची आज शहरातुन हत्तीवरुन मिरवणूक काढण्यात आली व या मिरवणूकीचा
समारोप उर्दु हायस्कुलच्या पटांगणात भव्य नागरी सत्कार समारंभात करण्यात आला.
यावेळी खासदार ए.टी.पाटील,
आमदार उन्मेष पाटील, आमदार राजूमामा भोळे, उदय वाघ, माजी आमदार साहेबराव घोडे,
वाडीलाल राठोड, सतिष दराडे, के.बी.साळुंखे, यांच्यासह विजय चौधरी चे वडील नथ्थु
चौधरी व आई रंजना चौधरी आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात ना.खडसे
म्हणाले की, महाराष्ट्र केसरी विजय चौधरी याचा सत्कार हा शेकडो विजय चौधरी तयार
करण्यासाठी प्रेरणादायी सत्कार असून कुस्तीगिरांसाठी शासनातर्फे व्यापक असे धोरण
आखण्यात येईल. त्याच बरोबर त्यांना आजिवन मानधन व एस.टी.मोफत प्रवास उपलब्ध करुन
देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही याप्रसंगी दिले. गाव तेथे व्यायामशाळा हे
धोरण पुर्वीपासूनच आमलात आले आहे मात्र त्यासाठी योग्य तो पाठपुरावा न केल्यामुळे
शासनाकडून मिळणारा निधी इतरत्र वळविला जातो. यासाठी सर्व संबंधितांनी योग्य
पाठपुरावा केल्यास गाव तेथे व्यायामशाळा उभारण्यास मदत होईल असेही ना.खडसे यावेळी
म्हणाले तसेच तालुक्यात राहूरी कृषि विद्यापीठाच्या धर्तीवर लिंबू संशोधन केंद्र
उभारण्यासाठी तसेच बेलगंगा साखर कारखाना कार्यान्वित करण्यासाठी शासन स्तरावर
पाठपुरावा करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी खासदार ए.टी.पाटील
म्हणाले की, देशी खेळांची व्यापकता वाढविण्याची गरज असून खेळाडुंना सोयी सुविधा
उपलब्ध करुन देण्याचे पालकमंत्री ना.खडसेंना यांना आवाहन केले. शहरीकरणाच्या
आधुनिकीकरणामुळे व्यायामशाळा नष्ट होतांना दिसतात परंतु व्यायामशाळा ही काळाची गरज
ओळखुन त्यांचे संरक्षण व संवर्धन होणेही गरजेचे असल्याची प्रतिक्रीया त्यांनी
यावेळी दिली.
विजय चौधरींचा जिवन प्रवास
अंगावर शहारे आणणारा असून गिरणा खो-यात मिळालेल्या या हि-याला विविध पैलू
पाडण्यासाठी व त्याच्या ध्येयपुर्तीसाठी योगदान देणार असल्याचे आमदार उन्मेष पाटील
आपल्या भाषणात म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र केसरी विजय
चौधरी आपल्या मनोगतात म्हणाले की, कुठल्याही क्षेत्रात प्राविण्य मिळविण्यासाठी
मेहनत गरजेची असून मेहनतीसोबत चिकाटी धरुन वाटचाल करा असे आवाहन उपस्थित कुस्तीप्रेमींना
केले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक
राजेंद्र चौधरी व आण्णा कोळी यांच्या हस्ते हिंद केसरी अमोल बुचडे, रोहीत पटेल
यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सतिष दराडे, राजेंद्र चौधरी, आबा पहेलवान अमोल
बुचडे, रोहीत पटेल यांनी मनोगत व्यक्ते केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आण्णा कोळी
यांनी केले तर आभार नगर परिषदेचे विरोधी पक्षनेता राजेंद्र चौधरी यांनी मानले.
प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र केसरीचा सत्कार करणार
महाराष्ट्र केसरी विजय चौधरी
यांचा येत्या 26 जानेवारी, 2015 रोजी साजरा होणा-या प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय
समारंभात सत्कार करण्याच्या सुचना ना.खडसे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या तर विजय
चौधरीच्या भावी वाटचालीस आर्थिक मदत व्हावी या करिता वैयक्तीक 11 लाखाची देणगी
जाहिर केली. तसेच खासदार ए.टी.पाटील, आमदार राजु भोळे व आमदार उन्मेष पाटील यांनी
देखील प्रत्येकी 1 लाखाची देणगी जाहिर केली आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment