पोलीस परेड मैदानावर प्रांताधिका-यांचे हस्ते ध्वजारोहण
चाळीसगांव,दिनांक 26:- पोलीस परेड मैदानावर प्रजासत्ताक दिनाचा
मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ आमदार उन्मेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत
प्रांताधिकारी मनोज घोडे पाटील यांच्या हस्ते सकाळी 09:15 वाजता संपन्न झाला.
यावेळी नगराध्यक्ष भोजराज पुन्शी, सभापती आशालता साळुंखे, उपभापती लता दौंड, माजी
आमदार राजीव देशमुख, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, उदेसिंग पवार,
तहसिलदार बाबासाहेब गाढवे, गटविकास अधिकारी मालती जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी
केशव पातोंड, मुख्याधिकारी रविंद्र जाधव, पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्यासह
विविध संस्थांचे पदाधिकारी, माजी सैनिक, पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक, जेष्ठ नागरिक
व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी
पोलीस प्रशासन व होमगार्ड यांनी पथसंचलन करुन ध्वजास मानवंदना दिली. तर जयहिंद
माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले. यावेळी
काकासाहेब पुर्णपात्रे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पाचवी ते सातवीच्या
विद्यार्थ्यांनी मानवी मनो-यांचे सादरीकरण केले. यानंतर प्रांताधिकारी मनोज घोडे
पाटील यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.
पंचायत समिती चाळीसगाव येथे सभापतींच्या हस्ते ध्वजारोहण
पंचायत समिती चाळीसगाव येथे 26 जानेवारी,
2015 रोजी प्रजासत्ताक दिनानिमीत्त सकाळी 07:00 वाजता सभापती सौ.आशालता साळुंखे
यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाला. याप्रसंगी उप सभापती सौ.लताताई दौड,
पं.स.सदस्य सतिष पाटे, जनन्नाथ महाजन, सुवर्णा मांडोळे, माजी सभापती विजय जाधव, गटविकास
अधिकारी मालती जाधव, सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश नरवाडे, उप विभागीय अभियंता
एम.आर.पाटील, प्रभारी गट शिक्षणाधिकारी एस.पी.विभांडीक
यांच्यासह जिल्हा परिषद तथा पंचायत समिती
सदस्य, पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
ध्वजारोहण समारंभानंतर बेटी बचाओ बेटी पढाओ या चित्ररथाव्दारे जनजागृती करण्यात
आली. तर सभापती सौ.आशालता साळुंखे यांनी सर्व उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या
शुभेच्छा दिल्या.
नगराध्यक्ष भोजराज पुन्शी यांच्या हस्ते शिवाजी घाट येथे
ध्वजारोहण संपन्न
चाळीसगाव शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष भोजराज
पुन्शी यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमीत्त
शिवाजी घाट येथे सकाळी 08:20 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला
यावेळी माजी आमदार राजीव देशमुख, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप देशमुख,
नगरसेवक पद्मजा देशमुख, शोभा जाधव, शाम देशमुख, संजय घोडे, संजय अग्रवाल, हाजी
गफ्फुर, प्रभाकर चौधरी, शेखर बजाज, पंडीत चौधरी, राजेंद्र चौधरी, सुरेश चौधरी,
मुख्याधिकारी रविंद्र जाधव, प्रशासन अधिकारी खरात, सि.एम.खडके, राजू पाटील, दिनेश
जाधव, संजय अहिरे, संजय गोयर यांच्यासह नगरसेवक, नगर परिषदेचे पदाधिकारी, जेष्ठ व
प्रतिष्ठीत नागरिक आदी मोठया संख्येने उपस्थित होते.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment