26 जानेवारी रोजी सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभेचे आयोजन
कृती आराखडयासह ठराव करण्याचे सभापतींचे आवाहन
चाळीसगांव,दिनांक 25:- तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास
अधिकारी यांनी 26 जानेवारी, 2015 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभा आयोजित
करण्याच्या सुचना केल्या आहेत. या ग्रामसभेमध्ये विविध शासनाच्या योजनाबाबत प्रमुख
विषय घेऊन या विषयांचा कृती आराखडा मंजूर करुन तसा ठराव घेणे व त्या ठरावाची
इतिवृत्तात नोंद घेण्याचे आवाहन पंचायत समिती सभापती सौ.आशालता साळुंखे यांनी
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
ग्रामसभेला असलेल्या अधिकाराचा पुरेपुर वापर
केल्यास गावातील समस्या, अडचणी, तंटे, शासकीय योजना याबाबत एकत्रित बसून ठराव
केल्यास गावातील प्रश्न गावातच सोडविले जाऊ शकतात, महात्मा गांधी ग्रामीण हमी रोजगार योजना, जयलयुक्त शिवार
अभियान, बेटी बचाव अभियान या सारख्या शासनाच्या विविध योजनांच्या एप्रिल-2014 ते
आजतागायत निर्गमीत झालेल्या शासन निर्णय व योजनांचे परिपत्रकांचे वाचन
ग्रामसभेमध्ये करावे, जेणेकरुन ग्रामपातळी वरील सर्व नागरिकांना या बाबत सखोल
ज्ञान मिळेल व शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहचण्यास मदत होईल. तरी सर्व
ग्रामपंचायतींच्या पदाधिका-यांसह ग्रामस्थांनी ग्रामसभेत सहभागी होण्याचे आवाहन
पंचायत समिती सभापती सौ.अशालता साळुंखे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
* * * * * * * *
प्रजासत्ताक दिनाचा 65 वा वर्धापनदिनी उपस्थित रहावे
सहा.गटविकास अधिकारी सुरेश नरवाडे यांचे आवाहन
चाळीसगांव,दिनांक 25:- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 65 व्या
वर्धापन दिनोत्सवानिमित्त 26 जानेवारी, 2015 रोजी सकाळी 7:00 वाजता ध्वजारोहणाचा
शासकीय समारंभ पंचायत समिती सभापती सौ.आशालता साळुंखे यांच्या हस्ते पंचायत समिती
आवार, चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास तालुक्यातील अधिकाधिक
लोकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक गट विकास अधिकारी सुरेश नरवाडे यांनी
केले आहे. पंचायत समितीतंर्गत येणाऱ्या जि.प.बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, सिंचन
विभाग, तालुका वैद्यकीय अधिकारी, एकात्मिक बालविकास प्रकल्पासह पंचायत समिती
अंतर्गत येणा-या सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचा-यांनी या कार्यक्रमास उपस्थित
रहावे, अनुपस्थित राहणा-या अधिकारी कर्मचा-या विरुध्द शिस्त भंगाची कार्यवाही
करण्यात येईल असेही सहाय्यक गट विकास अधिकारी नरवाडे यांनी कळविले आहे.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment