सेंद्रीय शेती ही काळाची गरज !
:आमदार उन्मेश पाटील
चाळीसगांव,दिनांक 17:- काळया आईची प्रामाणिकपणे
सेवा करणा-या बळीराजाने सेंद्रीय पध्दतीने शेती कडे वळण्याचे आवाहन आमदार उन्मेश
पाटील यांनी केले. कृषी विभागाच्या प्रांगणात रब्बी हंगाम 2014 अंतर्गत बियाणे,
खते व औजारे वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी के.बी.साळुंखे, सतिष
पाटे, जगन्नाथ महाजन, संजय पाटील, सरदार राजपुत, सुवर्णा मांडोळे, अनिल नागरे,
तालुका कृषी अधिकारी व्ही.एस.शिंदे यांच्यासह लाभार्थी मोठया संख्येने उपस्थित
होते.
तरुण
पिढीने शेती व्यवसायाकडे वळुन हवामान, माती व पाणी याची गुणवत्ता पारखून शेती
करण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी केले. कृषी विभागाकडून राबविण्यात येणा-या विविध
योजना ह्या पारदर्शीपणे राबवाव्यात, पिक निहाय संघ तयार करावे, योजना राबवितांना प्रामाणिक
शेतक-यांना न्याय द्यावा अशा प्रकारच्या विविध सुचनाही आमदार पाटील यांनी तालुका
कृषी अधिका-यांना केल्या.
तरुणांना उद्योग व्यवसायासाठी
रोजगार स्वयंरोजगार केंद्र उभारणार
तालुक्यातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांसाठी उद्योग
व्यवसाय उभारण्याच्या मार्गदर्शनासाठी रोजगार व स्वयंरोजगार केंद्र उभारणार
असल्याचे आमदार पाटील यांनी या कार्यक्रमात केले.
कार्यक्रमाचे
अध्यक्ष के.बी.साळुंखे यांनी मनोगत व्यक्त
करुन आमदाराच्या भावी वाटचालींना शुभेच्छा दिल्या तर तालुका कृषी अधिकारी
व्ही.एस.शिंदे यांनी राबविण्यात येणा-या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत
कडधान्य विकास प्रकल्पाबाबत विस्तृत स्वरुपात माहिती देऊन कृषी विभागामार्फत
देण्यात येणा-या प्रत्येक लाभार्थ्यांच्या कामकाजात पारदर्शीपणा असल्याचे आश्वासन
देऊन तक्रारी असल्यास थेट कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
* * * * * * * *
No comments:
Post a Comment