डाक अदालत 18 डिसेंबर रोजी
जळगाव, दिनांक 3 :- पोस्टाच्या टपाल,
स्पीड- पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तु, पार्सल, बचत बॅक, मनीऑर्डर आदि
कामासंबंधीच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी अधिक्षक डाकघर जळगाव येथे दिनांक 16
डिसेंबर 2013 रोजी सकाळी 11 वाजता डाक
अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.
पोस्टाच्या कामासंबंधीच्या तक्रारींचे सहा आठवडयाच्या आत निराकरण झाले नसेल
व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारींची दखल डाक अदालतमध्ये घेण्यात येणार
आहे. तरी संबंधितांनी आपली तक्रार दोन प्रतीत सहाय्यक निदेशक (तक्रार)
तथा सेक्रेटरी, डाक अदालत, चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांचे
कार्यालय, मुंबई जी. पी ओ बिल्िडंग दुसरा माळा, मुंबई यांच्या नांवे अतिरिक्त प्रतीसह दिनांक 5
डिसेंबर 2013 पर्यत अथवा तत्पूर्वी पोहोचेल, अशा बेताने पाठवावी संबंधितानी डाक अदालतीचा लाभ घ्यावा असे आवाहन
चीफ पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांनी केले आहे.
* * * * * * *
कामगार न्यायालयाची लोकअदालत
8 डिसेंबर रोजी
जळगाव, दिनांक 3 :- कामगार न्यायालय, जळगाव
येथील प्रलंबीत असलेले खटले तडजोडीने व लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी सदस्य
सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव यांच्या मार्फत रविवार दिनांक 8 डिसेंबर
2013 रोजी सकाळी 10.30 वाजता कामगार न्यायालय परिसर, जुने बी. जे. मार्केट, 3
मजला, 3 रा मजला, जी गाळा, जळगाव येथे लोकअदालत घेण्यात येणार आहे. तरी ज्यांना
लोक अदालतमध्ये केसेस ठेवावयाच्या असतील त्या सर्व संबंधितांनी स्वत: संमतीपत्रक
भरुन द्यावे असे आवाहन न्यायालय अधिक्षक
अशोक पानपाटील यांनी केले आहे.
* * * * * * *
निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा
जळगाव, दि. 3 :- जिल्हयातील राज्य
शासकीय निवृत्तीवेतन धारकांचा दिनांक 11 डिसेंबर
2013 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा कोषागार कार्यालय,जिल्हाधिकारी
कार्यालयाशेजारी जळगाव येथे मेळावा आयोजित केला आहे.
या मेळाव्यामध्ये निवृत्तीवेतनधारकांना मिळणारे
निवृत्तवेतन व इतर लाभ देण्यासंबंधी येणा-या अडीअडचणींचा आढावा घेण्यात येणार आहे.
तरी संबंधितांनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन शि. बा. नाईकवाडे जिल्हा
कोषागार अधिकारी यांनी केले आहे.
* * * * * * *
No comments:
Post a Comment