Friday, 6 December 2013

चार चाकी वाहनांसाठी नवीन पसंती क्रमांक मालिका


चार चाकी वाहनांसाठी नवीन पसंती क्रमांक मालिका

        जळगाव, दिनांक 6 :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे चार चाकी नवीन नोंदणी एमएच -19 / बीयु 0001 ते 9999 पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येत आहे. ज्या वाहन धारकांना आपल्या वाहनांकरीता पसंतीचा नोंदणी क्रमांक हवा असेल त्यांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्ज  करावा व विहित शुल्क भरुन पसंतीचा क्रमांक मिळवावा. नोंदणी शुल्क भरल्यानंतर वाहन 30 दिवसाचे आत नोंदणी करुन कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील. या मुदतीत  वाहन नोंदणी न केल्यास भरलेले शुल्क परत होणार नाही. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
     
* * * * * * * * *

पालकमंत्री संजय सावकारे यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम

          जळगाव,दि. 6:-  राज्याचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धविकास, रोजगार व स्वयंरोजगार, सामाजिक न्याय आणि भटक्या व विमुक्त जातींचे कल्याण राज्यमंत्री तथा जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री  संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :-
            शनिवार दिनांक 7 डिसेंबर 2013 रोजी सकाळी 7.00 वा. महाराष्ट्र एक्सप्रेसने भुसावळ येथे आगमन, सकाळी 10.00 वा. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2013-14 स्थळ - सेंट अलाएंस हायस्कूल, भुसावळ, सकाळी 10.30 वा. शासकीय मोटारीने जळगाव कडे प्रयाण, सकाळी 11.00 वा. स्वावलंबन कार्यशाळेबाबत आढावा सभा स्थळ - जिल्हाधिकारी कार्यालय दालन, दुपारी 3.00 वा. लोकप्रतिनिधींच्या मौलिक सुचना विचारात घेणेबाबत आढावा सभा स्थळ- जिल्हाधिकारी कार्यालय  दालन , दुपारी सोयीनुसार  शासकीय मोटारीने रावेरकडे प्रयाण, दुपारी 4.00 वा. पशुवैद्यकीय दवाखाना भूमिपूजन रावेर, संध्याकाळी 5.00 वा. रुग्णालय उदघाटन स्थळ सावदा,  ता. रावेर, संध्याकाळी सोयीनुसार शासकीय वाहनाने भुसावळकडे प्रमाण.
               
* * * * * * * * *

पाल व खानापूर येथील येथील
मद्य विक्रीची दुकाने  8 डिसेंबर रोजी बंद

               जळगाव, दिनांक 6 :- मध्यप्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुक मतमोजणी दिनांक 8 डिसेंबर 2013 रोजी संपन्न होत आहे. मध्यप्रदेश राज्याच्या सिमेलगत ब-हाणपुर तालुक्याच्या सिमेलगत जळगाव जिल्हयाची  सीमा येत असल्याने जळगाव जिल्हयातील पाल व खानापुर ता. रावेर हे गाव सिमेलगतची मदय विक्रीची दुकाने दिनांक 8 डिसेंबर 2013 रोजी मतमोजणीच्या दिवशी मतमोजपणी संपेपर्यंत बंद राहतील. सदर आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूकर यांनी कळविले आहे.
     
* * * * * * * * *

निवृत्तीवेतन धारकांनी  15 डिसेंबर पूर्वी
हयातीचा दाखले सादर करावेत

        जळगाव, दि. 6 :- निवृत्तीवेतन घेणा-या निवृत्तीवेतनधारकांचे व इतर राज्य निवृत्ती वेतन,  कुटूंब निवृत्तीवेतन धारकांनी दिनांक 1 नोव्हेंबर 2013 रोजीच्या शासन निर्णया नुसार हयात असल्याचे व पुनर्विवाह न केल्याचे प्रमाणपत्र कोषागारास संबंधीत बँकेमार्फत सादर करणे आवश्यक आहे. प्रमाणपत्र, दाखला प्राप्त न झाल्यास माहे डिसेंबर 2013 चे निवृत्तीवेतन थांबविण्याबाबत आदेश आहेत. यापूर्वी दिनांक 20 नोव्हेंबर 2013 पावेतो हयातीचे दाखले सादर करणेबाबत कळविले होते. तथापि अजून 20 टक्के निवृत्तीवेतन धारकांचे हयातीचे दाखले प्रलंबीत आहेत.  तरी निवृत्ती वेतन धारकांनी हयातीचे दाखले संबंधीत बँकेस दिनांक 15 डिसेंबर 2013 पावेतो सादर करावेत. त्यानंतर प्राप्त होणा-या निवृत्ती वेतनधारकांचे निवृत्तीवेतन थांबविण्यात येईल, असे  जिल्हा कोषागार अधिकारी शि. बा. नाईकवाडे यांनी कळविले आहे.
     
* * * * * * * * *

                                हरभरा  व तूर कीड रोगाविषयी मार्गदर्शन व सल्ला

           जळगाव, दि. 6 :- जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यातील हरभरा, व तूर हे पीक मोठया प्रमाणात घेतले जाते.
          शासनाने या पिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी तालुकास्तरावर कीड सर्वेक्षक व कीड नियंत्रक यांची नेमणूक केली आहे. सद्यस्थितीत  हरभरा व तूर पिकावर खालीलप्रमाणे किडींचा प्रादुर्भाव आढळून आला असून या रोग नियंत्रणासाठी कृषि विषयक सल्ला पुढीलप्रमाणे-
             तूर -  शेंग अळीच्या नियंत्रणासाठी इमॅमेक्टीन बेन्झोएट 2 मिली  + ॲसिटामीप्रीड 20 एसपी 10 मिली प्रति 10 लिटर पाण्यात 1 टक्का गुळाच्या द्रावणातून किंवा 25 ईसी क्विनॉलफॉस 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
         हरभरा- मरग्रस्त झाडे मुळांसकट ( माती बरोबर ) उपटून जाळून नष्ट करावीत. जेणे करुन पुढील प्रादुर्भाव वाढणार नाही. प्रति हेक्टर 1 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा पावडर 25 ते 30 किलो शेणखतात मिसळून पाण्याची  पाळी देण्या अगोदर टाकावे.
     

     * * * * * * * * *

No comments:

Post a Comment