Thursday, 5 December 2013

केळी पिकावरील किड रोगाचे निर्मूलन करावे

केळी पिकावरील किड रोगाचे निर्मूलन करावे

           जळगाव, दि. 5 :- यावल, रावेर , मुक्ताईनगर तालुक्यातील केळी पिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी तालुकास्तरावर किड सर्वेक्षण व किड नियंत्रकाची नेमणूक करण्यात आली आहे.
          सद्यस्थितीत केळी पिकावर किडींचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. सदरचे किड रोग नियंत्रणासाठी कृषी विभागाने पुढीलप्रमाणे सल्ला दिला आहे. - फुलकिडीने प्रादुर्भाव झालेल्या केळी घडाचे निरीक्षण घेवून अपरीपक्व फळांवर खरचटल्या सारखा भाग दिसल्यास प्रादुर्भावग्रस्त फळांची नोंद घेवून 10  टक्के  किंवा 10-15 फुलकिडी प्रति केळीच्या बेचक्यात आढळल्यास ॲसिटामीप्राईड 5 मिली किंवा फिप्रोनील 15 मिली किंवा व्हर्टीसिलीयम 30 ग्रॅम +  स्टिकर 10 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे. किंवा 5 टक्के निंबोळी अर्क फवारावे.  पानाचा भाग जर करपाग्रस्त असेल तर प्रकाशसंश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे करपाग्रस्त पान पूर्णपणे न काढता फक्त करपाग्रस्त भागच काढावा. तसेच त्यावर प्रॉपीकोनॅझोल 5 मिली  +  खनीज तेल( मिनरल ऑईल ) 100 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे.

                                                                  * * * * * * *

                             ना. एकनाथराव खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम

          जळगाव, दि.5 :- महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. एकनाथराव खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          शुक्रवार  दिनांक  6  डिसेंबर 2013 रोजी पहाटे 5. 40 वा. राजेंद्रनगर एक्सप्रेसने  जळगाव रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने निवासस्थानाकडे प्रयाण,  
किंवा
          पहाटे 6.10 वा. अमृतसर एक्सप्रेसने जळगाव रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय निवासस्थानाकडे प्रयाण, दिवसभर जळगाव जिल्हयातील स्थानिक विकास कार्यक्रमांना उपस्थिती.
             शनिवार दिनांक 7 डिसेंबर 2013 रोजी  संपूर्ण दिवस जळगाव येथे अभ्यागतांच्या भेटीसाठी राखीव ( स्थळ : मुक्ताई बंगला, जळगाव), रात्री 9.50 वा. जळगाव येथुन सेवाग्राम एक्सप्रेसने नागपुरकडे प्रयाण.


                                                                  * * * * * * *

No comments:

Post a Comment