महावितरणाच्या
वसुली मोहिमेस उत्तम प्रतिसाद
कृषि पंप
ग्राहकांने भरली एक-रकमी थकबाकी
चाळीसगाव दिनांक 26 :- राज्य शासनाच्या आदेशानुसार
संपुर्ण राज्यभरात महावितरण मुख्यालय, मुंबई यांचेकडून थकबाकीदार कृषि पंप
ग्राहकांची वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या नुसार परिमंडळ कार्यालय,
जळगांव यांच्या अधिपत्याखालील चाळीसगाव विभागात देखील कृषि पंपांची विज बिलाची
थकबाकी वसुली मोहिम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आतापर्यंत चाळीसगाव
ग्रामीण उप विभाग क्रं.1 मध्ये जवळपास 1495 ग्राहकांचा विज पुरवठा खंडीत करण्यात
आला असुन त्यांचे कडून थकबाकी वसुलीची कार्यवाही सुरु आहे. मुख्यालयाने
एप्रिल-2012 ते डिसेंबर-2013 या कालावधीतील एकूण सहा विज बिलांच्या वसुलीचे आदेश
पारित केले आहेत. त्या अनुषंगाने चाळीसगाव तालुक्यातील प्रगतीशिल शेतकरी
श्री.शांताराम दराडे, करंजगांव ता.चाळीसगांव यांनी एक रकमी 65 हजाराची विज बिलाची
थकबाकी महावितरण ग्रामीण उपविभाग क्रं.1 चे
सहाय्यक अभियंता धिरज चव्हाण यांच्याकडे भरणा केला आहे. या निमीत्ताने शेतक-यांनी
या उपक्रमात सक्रीय सहभागी होण्यास प्रोत्साहन मिळावे हा उद्देश ठेवून
श्री.शांताराम दराडे यांना चाळीसगांव ग्रामीण उपविभाग क्रं 1 कार्यालयातच शाल व
श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तरी
तालुक्यातील इतर कृषि पंप ग्राहक, शेतक-यांनी श्री.शांताराम दराडे यांचा आदर्श समोर
ठेवून आपल्याकडील विज बिल थकबाकीचा भरणा करावा व महावितरणाच्या विज तोडण्याच्या
कटू कारवाईपासून मुक्त व्हावे असे आवाहन महावितरण, चाळीसगाव विभागाचे कार्यकारी
अभियंता, श्री.डि.के.मोहोड यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
* * * * * *
* *
टिप : सदर वृत्ताचे छायाचित्र
हे या कार्यालयाच्या ब्लॉग वर उपलब्ध आहे
BLOG ADD. :
www.siochalisgaon.blogspot.in
* * * * * * * *
No comments:
Post a Comment