दुय्यम कारागृह
चाळीसगाव अन्न-पाणी पुरवठा निविदा मागविल्या
जळगाव, दि. 12 :- दुय्यम कारागृहातील वर्ग -2 कैद्यांना दिनांक 1/1/2014 ते
31/12/2014 या कालावधीसाठी शिजवून तयार केलेले अन्न तसेच पिण्यासाठी व स्नानासाठी
दिवसातून कमीत कमी दोन वेळा पाणी पुरविण्याचा मक्ता दयावयाचा आहे. त्याकरीता
सिलबंद निविदा मागविण्यात येत आहे. सदरच्या निविदा दिनांक 21 डिसेंबर 2013 रोजी
15.00 वाजेपावेतो (सुटीचे दिवस सोडून) तहसिल कार्यालय, चाळीसगाव येथे पोहोचतील अशा
बेताने टपालाने अगर समक्ष सादर कराव्यात. मुदतीनंतर आलेल्या निविदांचा विचार केला
जाणार नाही. असे अधिक्षक दुय्यम कारागृह,
चाळीसगाव यांनी केले आहे.
* *
* * * * * *
केळी पिकावरील किड रोगाचे निर्मूलन करावे
जळगाव, दि. 12 :- यावल, रावेर , मुक्ताईनगर
तालुक्यातील केळी पिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी तालुकास्तरावर किड सर्वेक्षण व किड
नियंत्रकाची नेमणूक करण्यात आली आहे.
सद्यस्थितीत
केळी पिकावर किडींचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. सदरचे किड रोग नियंत्रणासाठी
कृषी विभागाने पुढीलप्रमाणे सल्ला दिला आहे. - पानाचा भाग जर करपाग्रस्त असला तर
प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे करपाग्रस्त पान पूर्णपणे न
काढता फक्त करपाग्रस्त भागच काढावा. तसेच त्यावर प्रॉपीकोनॅझोल 5 मीली + खनीज ते (
मिनरल ऑईल) 100 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे.
फुलकिडीने प्रादुर्भाव झालेल्या केळी घडाचे निरीक्षण घेवून अपरीपक्व फळांवर
खरचटल्या सारखा भाग दिसल्यास प्रादुर्भावग्रस्त फळांची नोंद घेवून 10 टक्के
किंवा 10-15 फुलकिडी प्रति केळीच्या बेचक्यात आढळल्यास ॲसिटामीप्राईड 5
मिली किंवा फिप्रोनील 15 मिली किंवा व्हर्टीसिलीयम 30 ग्रॅम +
स्टिकर 10 मिली 10 लिटर पाण्यातून फवारावे. किंवा 5 टक्के निंबोळी अर्क
फवारावे.
* *
* * * * * *
16 डिसेंबर
रोजी महिला लोकशाही दिन
जळगाव, दि. 12 :- जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दिनांक
16 डिसेंबर 2013 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यांत
आलेला आहे. तरी संबंधीत समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन
सदस्य सचिव महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मध्यवर्ती
प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, आकाशवाणी चौकाजवळ जळगाव, दूरध्वनी क्र. 0257-
2228828 यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये
केले आहे.
* *
* * * * * *
No comments:
Post a Comment