Saturday, 7 December 2013

वनश्री, इंदिरा प्रियदर्शनी पुरस्कार विजेत्यांचे स्नेहसंमेलन संपन्न

वनश्री, इंदिरा प्रियदर्शनी पुरस्कार विजेत्यांचे स्नेहसंमेलन संपन्न

              जळगाव, दिनांक 7 :- वनश्री व इंदिरा प्रियदर्शनी पुरस्कार प्राप्त व्यक्ती, संस्थाचे स्नेह संमेलन हॉटेल क्वालिटी इन,  नाशिक येथे नुकतेच संपन्न झाले. या संमेलनास नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर , नंदुरबार जिल्हयातील पुरस्कार प्राप्त व्यक्ती, संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
            कार्यक्रमाचे उदघाटन नाशिकचे मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रकाश यांचे उपस्थितीत संपन्न झाले यावेळी भाऊसाहेब मोरे, किरण चव्हाण, ए. एम. विसपुते, पी. एन. पाटील, उपस्थित होते. पुरस्कार प्राप्त विजेत्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
          पुढील काळात संस्था, व्यक्ती यांचे वर्षानुवर्ष कामात सातत्य ठेवून त्याची व्यापकता वाढवली आहे. वृक्ष लागवड बाबत प्रोत्साहित करणे, विद्यार्थ्यामार्फत वृक्ष लागवड व परीसर स्वच्छता, इंधन बचत पर्यावरण पुरक बाबीमध्ये होत असलेली वाढ समाधान देणारी ठरली आहे.
            शासनाने पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर या विजेत्यांनी आठवण ठेवून त्यांना सन्मानीत केले ही बाब सर्वांना आनंददायक ठरली इतरांनी याबाबत प्रेरणा घेऊन दर वर्षी असे संमेलन ठिक ठिकाणी विजेत्यांचे गावत आयोजित व्हावे अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

                                                                * * * * * * * *

No comments:

Post a Comment