Wednesday, 4 December 2013

लैंगिक शोषण संरक्षण अधिनियमात सुधारणा

लैंगिक शोषण संरक्षण अधिनियमात सुधारणा

           जळगाव, दि.4: फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुराव्याचा कायदा आणि मुलांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियमात सुधारणा करण्यात आलेली आहे.  या सुधारणा दिनांक 3 एप्रिल 2013 पासून अंमलात आल्या असून यातील महत्वाच्या सुधारणा पुढीलप्रमाणे आहे. 
             भारतीय दंडविधान संहितेत कलम 326 (अ) व  (ब) अन्वये ॲसिड हल्ल्याच्या गुन्हयाकरीता 10 वर्ष ते आजीवन कारावासाची शिक्षा दिली आहे. कलम 354 अन्वये महिलेच्या विनयभंगाच्या गुन्हयात 1 ते 5 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षेची तरतूद केली आहे. कलम 354 (अ) अन्वये लैंगिक छळांच्या गुन्हयाकरीता  3 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा दिली आहे. कलम 354 (ब), 354 (क) व 354 (ड) अन्वये महिलांविरुध्द होणा-या पाठलाग, लपून पहाणे, चित्रीकरण करणे इत्यादी गुन्हयाकरीता शिक्षेची तरतूद केलेली आहे. कलम 370 अन्वये शोषणाकरीता केलेल्या मानवी वाहतुकीच्या गुन्हयाकरीता 7 ते 10 वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षेची तरतूद केली आहे. कलम 375 मध्ये बलत्काराच्या गुन्हयाची सुधारीत व्याख्या दिलेली आहे. कलम 376 अन्वये बलात्काराच्या गुन्हयाकरीता कमीत कमी 7 वर्ष ते आजीवन कारावाची शिक्षेची तरतूद केलेली आहे.

* * * * * * *

बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्‍या
स्वयंसेवी संस्थांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत

             जळगाव, दि. 4 :- सन 2013-14 या वर्षासाठी महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्‍या समाजसेविका व स्वयंसेवी संस्थांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात येणार आहे. जळगाव जिल्हयातील महिला व बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणा-या नामांकीत समाजसेविकांना राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय आणि स्वयंसेवी संस्थांना विभागीयस्तरीय पुरस्कार देण्यासाठी योग्य महिलांचे व संस्थाचे प्रस्ताव मागविण्यात येत आहे. तरी पात्र महिला व स्वयंसेवी संस्थांनी विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह प्रस्ताव सादर करावेत , अधिक माहिती व विहित नमुना अर्जाकरीता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आकाशवाणी जवळ जळगाव येथे संपर्क साधावा असे आवाह प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.


* * * * * * *

No comments:

Post a Comment