1 जानेवारी पासून संजय
गांधी योजना व
मंडळ अधिकारी जळगाव, प्रिंपाळा कार्यालय नवीन जागेत सुरु
जळगाव, दि. 30 :- जळगाव
येथील स्टेशन रोड लगतच्या शासकीय मिळकतीवरील
बांधीव तालुका प्रशासकीय इमारतीची दुरुस्ती व नुतनीकरण करण्यात आले असून सदर
तालुका प्रशासकीय इमारतीमध्ये दिनांक 1 जानेवारी 2014 पासून पहिला मजला हॉल क्र. 1
मध्ये तहसिलदार, संजय गांधी योजन, अ वर्ग न. पा. क्षेत्र जळगाव तर पहिला मजला हॉल
क्र. 2 येथे मंडळ अधिकारी, जळगाव यांचे कार्यालय आणि मंडळ अधिकारी पिंप्राळा ता.
जळगाव यांचे कार्यालय सदर जागेत सुरु होणार आहेत असे जिल्हाधिकारी जळगाव यांनी कळविले आहे.
* * * * * * *
पाणी अर्ज सादर करण्यासाठी 31
डिसेंबर पर्यत मुदतवाढ
जळगाव, दि. 30
:- गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव अंतर्गत
गिरणा प्रकल्पावरील पांझरा डावा कालवा, जामदा डावा कालवा व निम्न गिरणा
कालव्याव्दारे कालवा प्रवाही, कालवा उपसा, जलाशय उपसा, लाभ क्षेत्रातील अधिसूचित
नदी, नाले, ओढे यावरुन उपसा सिंचनाने तसेच लाभक्षेत्रातील व 35 मीटर आतील
विहिरीवरुन पाण्याचा लाभ घेणा-या
लाभार्थ्यासाठी गिरणा प्रकल्पात
यावर्षी अंशत: पाणीसाठा उपलब्ध झालेल्या आहे. त्यापैकी पिण्याचे पाण्याचे आरक्षण
वगळून उर्वरीत उपलब्ध पाणीसाठयातून दिनांक 15 ऑक्टोंबर 2013 ते 28 फेब्रुवारी 2014
या कालावधीत रब्बी हंगाम 2013-14 मधील उभी पीके तसेच विहीरीवरुन किंवा अन्य
मार्गाने पाणी पुरवठयाची पर्यायी व्यवस्था असेल अशा लाभधारकांना गहू, हरबरा,
ज्वारी, दादर, हा. दूरी, मका, कडबाळ, कपाशी, सुर्यफुल , कुरडई, भाजीपाला इत्यादी
पिकांना जानेवारी 2014 मध्ये दोन आर्वतनात सिंचनाचे पाण्याच्या उपलब्धतेनुसार
सिंचनासाठी मर्यादित पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे., त्यासाठी अटींच्या पुर्ततेसह नमुना नं. 7, 7 अ, व 7 ब चे
पाणी अर्जावर मागणी करुन पाणीअर्ज दिनांक 20 डिसेंबर 2013 च्या आत मागविण्यात आले
होते. पंरतू पुरेसे मागणी अर्ज क्षेत्र प्राप्त न झाल्यामुळे पाणी मागणी
करण्यासाठी 31 डिसेंबर 2013 पर्यत मुदतवाढ देण्यात येत आहे. वाढीव मुदतीत अटींच्या
पुर्ततेसह नमुना नं. 7, 7 अ, व 7 ब चे पाणी अर्जावर मागणी करुन पाणी अर्ज दिनांक
31 डिसेंबर 2013 च्या आत संबंधीत पाटशाखेच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत
प्रत्यक्ष अगर पोष्टाने देण्याचे करावे. मुदत वाढीचा जास्तीत जास्त शेतक-यांनी लाभ
घ्यावा या नंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात
येणार नाही. सन 2013-14 मधील अटी व शर्ती बंधनकारक राहतील असे कार्यकारी अभियंता
गिरणा पाटबंधारे विभाग जळगाव यांनी कळविले आहे.
* * * * * * *
No comments:
Post a Comment