सैन्य
दलात धर्मगुरु भोजन कक्ष अधिका-यांची भरती
जळगाव, दिनांक 10 :- भारतीय सैन्य दलात धर्मगुरु व भोजनकक्षासाठी
कनिष्ठस्तर अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. धर्मगुरुपदासाठी
किमान पदवीधर आवश्यक, सोबत पंडीत पदाकरीता 10 वी व 12 वी स्तरापर्यंत संस्कृत
भाषा आवश्यक , मौलवी पदासाठी अरेबिक,
उर्दू भाषेचे शिक्षण आवश्यक तर पाद्री पदासाठी बिशपांच्या मान्यताप्राप्त
यादीवर असणे आवश्यक आहे.. वयोमर्यादा 27 ते
34 दरम्यान आहे. इच्छूकांनी आपले अर्ज रिक्रूर्टींग ऑफिसर, एचक्यू, आरटीजी झोन,
पुणे- 900449 व्दारा 56 A P O या पत्यावर 27 डिसेंबर 2013 पर्यंत पाठवावे, या पदांसाठी
चाळणी परीक्षा, शारीरिक क्षमता तपासणी 4 फेब्रुवारी 2014 रोजी अहमदाबाद येथे होईल.
तसेच भोजन कक्षातील भरतीसाठी 12
वी पर्यंत शिक्षण हॉटेल मॅनेजमेंट कॅटरींग डिप्लोमा आवश्यक, वयोवर्यादा 21 ते 27
वर्षे आवश्यक असुन या पदांसाठी दि. 11 जानेवारी 2014 पर्यंत एएससी सेंटर ( साऊथ ),
बंगलोर व्दारा - 56 A P O , येथे अर्ज
पाठवावे या पदांसाठी चाळणी व पात्रता परीक्षा 23 ते 25 मार्च 2014 दरम्यान बंगलोर
येथे होईल,असे सैन्य भरती कार्यालय, औरंगाबाद यांनी कळविले आहे.
*
* * * * * *
हरभरा व तूर कीड रोगाविषयी
मार्गदर्शन व सल्ला
जळगाव, दि. 10 :- जळगाव, भुसावळ,
यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड या तालुक्यातील हरभरा, व तूर हे पीक मोठया
प्रमाणात घेतले जाते.
शासनाने या पिकांचे सर्वेक्षण
करण्यासाठी तालुकास्तरावर कीड सर्वेक्षक व कीड नियंत्रक यांची नेमणूक केली आहे.
सद्यस्थितीत हरभरा व तूर पिकावर
खालीलप्रमाणे किडींचा प्रादुर्भाव आढळून आला असून या रोग नियंत्रणासाठी कृषि विषयक
सल्ला पुढीलप्रमाणे-
तूर - शेंगा पोखरणारी अळी 5 टक्के निंबोळी तेल 10 मिली
+ 25 इसी क्विनॉलफॉस 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा 25 ईसी
क्विनॉलफॉस 20 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. मोठया अळया सकाळी लवकर
हाताने वेचून नष्ट कराव्यात किंवा इमॅमेक्टीन बेन्झोएट 2 मिली + 25 एसपी
ॲसिटामिप्रीड + 1 टक्के गुळ 10
लिटर पाण्यात मिसळून फवारावे. किंवा 75 एसपी ॲसिफेट 10 मिली 10 लिटर पाण्यात
मिसळून फवारावे.
हरभरा- मरग्रस्त रोपे मुळासकट ( माती बरोबर ) उपटून जाळून नष्ट केल्यास
पुढील प्रादुर्भाव कमी होतो.
*
* * * * * *
No comments:
Post a Comment