जिल्हा वेठबिगार दक्षता समितीची बैठक संपन्न
जळगाव, दि. 11 :- जिल्हास्तरीय वेठबिगार दक्षता
समितीची बैठक जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज
संपन्न झाली. सदर बैठकीस जी. जे. दाभाडे, सदस्य सचिव तथा सहाय्यक कामगार आयुक्त,
जळगाव, अशासकीय सदस्य रामराव राजाराम पाटील, अरुण शिवप्रकाश चांगरे, शांताराम
तोताराम सपकाळे तसेच अन्य शासकीय सदस्य उपस्थित होते. सदर बैठकीत प्रथम रामराव पाटील यांनी
जिल्हाधिकारी जळगाव यांचा सत्कार केला. यावेळी जी. जे. दाभाडे, सदस्य सचिव यांनी
सांगितले की, वेठबिगार पध्दत नाहिशी करुन वेठबिगार कामगारास मालकाच्या,
सावकाराच्या तावडीतून मुक्त करुन त्याचे समाजातील राहणीमान उंचावण्याच्या
उद्देशाने हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. वेठबिगार कामगार आढळून आल्यास महसूल
विभागामार्फत त्याचे पुनर्वसन करण्यात येते. यावेळी माहिती देण्यात आली की,
सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव यांचे कार्यालयाच्या अधिपत्याखालील कार्यरत चार
दुकाने निरीक्षक यांनी दि. 1 जुलै 2013 ते 30 नोव्हेंबर 2013 या कालावधीत एकूण 1,195 आस्थापनांना भेटी
दिल्या असता वेठबिगार कामगार आढळून आलेला नाही. सदरहू भेटी प्रामुख्याने
जिल्हयातील दुकाने व संस्था, गॅरेजेस, हॉटेल, ढाबा, रेस्टॉरंट, चहाटपरी इत्यादी
आस्थापनांना देण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी अध्यक्ष, तथा जिल्हाधिकारी, जळगाव यानी अशासकीय सदस्यांच्या केलेल्या
मागणीनुसार अशासकीय सदस्यांना देखील बाल कामगार धाडसत्रात सहभागी करुन घ्यावे, असे
सदस्य सचिव यांना निर्देश दिले .
*
* * * * * *
कृषीमंत्री ना.शरद पवार यांचा जळगाव जिल्हा
दौरा कार्यक्रम
जळगाव, दि. 11 :- केंद्रीय कृषी
व अन्न प्रक्रिया उदयोगमंत्री ना. शरद पवार हे जळगाव जिल्हयाच्या दौ-यावर येत असून
त्यांचा जळगाव जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दिनांक 15 डिसेंबर 2013 रोजी दुपारी
12.05 वा. दावलवाडी जि. जालना येथुन हेलिकॉप्टरने जळगावकडे प्रयाण, दुपारी 12.40
वा. जैनहिल्स जळगाव येथील हेलिपॅडवर आगमन, दुपारी 12.45 ते 1.45 वा. राखीव, दुपारी
2.15 ते 5.45 वा. जैन एरिगेशनच्या कार्यक्रमास उपस्थिती, सायंकाळी 6.00 वा. जळगाव
विमानतळ येथुन खाजगी विमानाने दिल्लीकडे प्रयाण
*
* * * * * *
विक्रेत्यांच्या संपकाळात औषधांसाठी पर्यायी
व्यवस्था
जळगाव, दि. 11 :- औषध विक्रेत्यांनी दिनांक 16, 17 व 18 डिसेंबर
2013 रोजी राज्यव्यापी बंदचे आवाहन केले आहे. औषधांचा अत्यावश्यक वस्तु कायदयात
समावेश असल्याने त्यांनी दिनांक 16, 17 व 18 डिसेंबर रोजी त्यांची औषधी दुकाने
सुरु ठेवावी, जेणेकरुन जनतेची गैरसोय होणार नाही व रुग्णांना आवश्यक तेव्हा औषधे
सहजगत्या उपलब्ध होतील. रुग्णांना औषधांअभावी त्रास होणे किंवा त्यामुळे आपतकालीन
परिस्थिती निर्माण होणे हे जनहिताच्या व जनस्वास्थ्याच्या दृष्टीने हितावह नाही,
म्हणून प्रशासनाने जनतेसाठी पर्यायी उपलबधता व संपर्क व्यवस्था केली आहे.
औषध पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सर्व सरकारी , निमसरकारी रुग्णालयात पुरेशा
प्रमाणात औषध साठा उपलब्ध राहील याची व्यवस्था केली आहे. सर्व खाजगी रुग्णालये व
वैद्यकीय व्यावसायिकांनी पुरेसा औषध साठा त्यांचेकडे ठेवण्याच्या सूचना देण्यात
आलेल्या आहेत. 24 तास उघडे असणा-या औषध
दुकानदारांना तसेच खाजगी व सरकारी रुग्णालयांशी संलग्न असलेल्या औषध
परवानेधारकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी जनहित व जनस्वास्थ्य विचारात घेवून
त्यांची दुकाने उघडी ठेवावीत. औषधाचा अत्यावश्यक वस्तु कायदा, 1955 मध्ये समावेश
असल्याने त्यांनी औषध दुकाने सुरु ठेवणे बंधनकारक आहे. आपतकालीन परिस्थितीत औषधे
उपलब्ध न झाल्यास जनतेने खालील अधिका-यांशी संपर्क साधावा. हे. य. मेतकर सहायक
आयुक्त दुरध्वनी क्र. 2217476, भ्रमणध्वनी क्र. 9730155370, एस. एस. देशमुख औषध निरीक्षक 2217476,
9850177853, डॉ. ए. एम. माणिकराव औषध निरीक्षक 2217476, 9373556025, अ. शि. सरकाळे
औषध निरीक्षक 2217476, 9890165018 असे आवाहन हे. य. मेतकर, सहाय्यक आयुक्त, अन्न व
औषध प्रशासन, जळगाव यांनी केले आहे.
*
* * * * * *
No comments:
Post a Comment