जळगांव, दि. 1 :- महाराष्ट्र शासनाच्या
सामाजिक न्याय विभागामार्फत कार्यरत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय
मुलांचे शासकीय वसतिगृह बोदवड, जि. जळगांव
या वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणा-या इयत्ता 8 वी ते महाविद्यालयीन शिक्षण घेणा-या
गरजू विद्यार्थ्याना कळविण्यात येते की, या वसतिग़ृहात सन 2013-2014 या शैक्षणिक
वर्षासाठी प्रवेश देण्याबाबतची प्रक्रिया सुरु झाली असून प्रवेश घेऊ इच्छिणा-या
अनु. जमाती, वि. जा. भ. ज. विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्टया मागासवर्गीय, अनाथ,
व अपंग या प्रवर्गातील विद्यार्थ्याना पुढील शिक्षणासाठी वसतिगृहात प्रवेश
घ्यावयाचा असल्यास विहित नमुन्यातील प्रवेश अर्ज वसतिगृहाच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.
परिपुर्ण भरलेला अर्ज अंतिम परिक्षेचा निकाल लागल्यापासून 15 दिवसांच्या आत
वसतिगृहात जमा करावेत. प्रवेश पात्रतेच्या अटी व नियम वसतिगृहाच्या प्रवेश
अर्जासोबत व कार्यालयात पाहावयास मिळतील. तरी गरजू विद्यार्थ्यानी वसतिगृह
प्रवेशासाठी संपर्क साधावा असे गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे
शासकीय वसतिगृह, बोदवड, जि. जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये आवाहन केले
आहे.
No comments:
Post a Comment