जळगांव, दि. 19 :- जिल्हयात खरीप हंगामासाठी
आवश्यक असलेले बियाणे व खतांच्या उपलब्धतेचे सुक्ष्म नियोजन करुन कृती आराखडा तयार
करावा. शेतक-यांना वेळेवर दर्जेदार बियाणे व खते माफक दरात उपलब्ध होतील याची
दक्षता संबंधीत अधिका-यांनी घ्यावी अशा सक्त सूचना राज्याचे कृषी परिवहन
राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी आज येथील
अल्पबचत सभागृहात दिल्या. खरीप आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन ते मार्गदर्शन
करीत होते. व्यासपीठावर यावेळी खासदर हरिभाऊ जावळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष
दिलीपराव खोडपे, जिल्हा बॅकेचे अधक्ष आमदार चिमणराव पाटील, आमदार कृषीभूषण
साहेबराव पाटील, जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर
राजूरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल उगले, कृषी सभापती श्रीमती कांताबाई
मराठे, विभागीय कृषी सहसंचालक डी. जी. काळाणे आदि उपस्थित होते.
श्री.
देवकर पुढे म्हणाले, दुष्काळी परिस्थितीत शेतकरी अडचणीत असल्याने खरीप हंगामात
चांगल्या प्रकारे मदत होईल असे नियोजन करावे खतांचे दर ठरविण्याचे अधिकार खत
कंपन्यांना मिळाल्याने गतवर्षापासून काही खतांचे दर वाढले आहेत. पर्यायी खते
वापरण्याबदद्यल शेतक-यांना मार्गदर्शन करुन सेंद्रीय खते वापरण्याबद्दल शेतक-यांचे
प्रबोधन करावे. खते बियाणे विक्रीत कोणतेही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता
घेवून गुणवंत्ता नियंत्रणाकडेही लक्ष
दयावे. केळी संशोधन केंद्रास आवश्यक असलेले मनुष्यबळ व इतर सामुग्री बाबत मागणी प्रस्ताव
सादर करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या.खरीप हंगाम 2013 साठी 563 कोटींचे
कर्ज वाटप केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. बैठकीस गैरहजर असणा-या अधिका-यांना
कारणे दाखवा नोटिस बजाविण्याचे संकेत त्यांनी दिले.
खासदार
हरिभाऊ जावळे, आमदार सर्वश्री कृषीभूषण साहेबराव पाटील, दिलीप वाघ, संजय सावकारे,
चिमणराव पाटील यांनी बैठकीत आपले विचार मांडले. या कार्यक्रमात कृषी विभागातर्फे
तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यांत आले.
बैठकीचे
सूत्रसंचालन अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. किसनराव मुळे यांनी तर आभार आत्माचे संचालक
श्री. ठाकूर यांनी मानले, बैठकीच्या प्रारंभी सभागृहात जि. प. सदस्य कै. निखील खडसे यांना श्रदांजली वाहण्यात आली
No comments:
Post a Comment