जळगांव, दि.16 :- जिल्हयातील
प्रत्येक तालुका सामुचित प्राधिका-यांवर स्त्रीभृणहत्या रोखण्याची जबाबदारी असून ग्रामीण
भागातील स्त्रीभृणहत्या प्रतिबंधा विषयी जनजागृती
करण्याकरिता आशा वर्कर्सचे
सहकार्य घेण्याची सूचना जिल्हाधिकारी
ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केली.
ते आज सकाळी
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पीसीपीएनडीटी
अंतर्गत टास्क फोर्सच्या
बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करत होते.
या बैठकीत जि. प. मुख्य
कार्यकारी अधिकारी शीतल उगले, जिल्हा
शल्यचिकित्सक एस गायकवाड
, डीएचओ एस.बी सोनवणे,
मनपा वैदयकीय अधिकारी श्रीमती शर्मा,
निवासी वैदयकीय अधिकारी नितीन भारंबे, महिला
असोसिएनच्या वासंती दिघे,
अन्न व औषधप्रशासनाचे गुलाबराव निनावे , डॉ. अनिल पाटील, विशेष
जिल्हा समाज कल्याण
अधिकारी व्ही.ए.पाटील,
सर्व तहसिलदार व मुख्याधिकारी
(न.पा) आदि
उपस्थित होते.
प्रारंभी जिल्हा
शल्यचिकित्सक श्री.गायकवाड यांनी स्त्रीभृणहत्या प्रतिबंधाकरिता विविध उपाय योजना
विषयी समिती सदस्यांना
मार्गदर्शन केले. तसेच
प्रत्येक तालुक्यातील वैदयकीय अधिक्षकांने मशीन शील
केलेल्या हॉस्पीटलच्या समोरील गर्भलिंग निदान चाचणी
विषयीचा बोर्ड काढून
ते सेंटर शील
केले असल्याचा बोर्ड लावण्याची
सूचना त्यांनी केली.
मशीन हॅडलर दोन ठिकाणी सोनोग्राफी करु शकतात.
परंतु त्यांच्या निर्धारित वेळेनंतर जर ती मशीन दुसरे कोणी वापरत
असेल तर असे
मशीन शील करुन
त्या सेंटरवर कारवाई करण्याची सूचना जिल्हा
शल्य चिकित्सक यांनी केली.
महानगर पालिकेच्या वैदयकीय अधिकारी श्रीमती शर्मा यांनी
6 जून पासून शहरात सोनोग्राफी
सेंटरवर राबविण्यात येत असलेल्या
धडक मोहिमेची माहिती बैठकीत दिली. त्यात
शहरातील 84 सोनोग्राफी
सेंटर पैकी 81 सेंटरची
तपासणी करुन 5 सेंटर
शील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले या 5 केंद्रावर
लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच
12 केंद्रावर न्यायालयीन केसेस सुरु
असल्याची माहिती श्रीमती शर्मा यांनी
दिली,
तर ग्रामीण भागातील एकूण सोनोग्राफी
केंद्रापैकी 12 सेंटर
बंद असल्याची माहिती डॉ. बडगुजर
यांनी दिली.
* * * * * *
No comments:
Post a Comment