Thursday, 14 June 2012

औरंगाबाद येथे 28 जून रोजी विभागीय डाक अदालत


जळगांव, दि. 14 - औरंगाबाद येथे पोस्टमास्तर जनरल औरंगाबाद रिजन यांचे कार्यालयात पोस्टाच्या कामासंबंधी तक्रारीचे निवारण करण्याकरिता दि. 28 जून 2012 रोजी विभागीय डाक अदालतीचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती अधिक्षक जळगांव डाकघर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
     पोस्टाच्या कामासंबंधी ज्या तक्रारीचे सहा आठवडयाच्या आत निवारण झाले नसेल अथवा समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारदारांनी डाकसेवेबाबतची आपली तक्रार दोन प्रतित सहाय्यक निदेशक डाकसेवा, पोस्टमास्तर जनरल औरंगाबाद यांचे कार्यालय, छावणी परिसर, औरंगाबाद यांचे नावे अधिकच्या प्रतीसह 20 जून पर्यंत पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नसल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

                                                                  *  *  *  *  *  * 

No comments:

Post a Comment