जळगांव, दि.
1:- फेब्रुवारी /
मार्च - 2012 मध्ये
घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक
प्रमाणपत्र (इ. 12 वी)
परीक्षेचा निकाल मंडळाच्या
अधिकृत संकेतस्थळावर शुक्रवार दिनांक 25 मे 2012
रोजी दुपारी 1.00 वाजता
जाहिर करण्यात आलेला आहे.
त्यानुसार कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व विद्यार्थ्यांचे तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख
तसेच इतर साहित्याचे
वाटप मंडळाच्या निर्धारित केलेल्या वितरण केंद्रावर
शनिवार दिनांक 2 जून
2012 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 या वेळेत मंडळ प्रतिनिधी
मार्फत हस्तपोच वाटप
करण्यात येणार आहे.
तरी सर्व उच्च माध्यमिक शाळा प्रमुखांनी
या प्रकटनांची नोंद घेवून
निकाल व इतर
साहित्य स्विकारण्यास्तव निर्धारित वेळेत संबंधित
वाटप केंद्रावर अधिकार पत्रासह जबाबदार प्रतिनिधीस पाठवावे. उपरोक्त दिनांकास साहित्य न स्विकारल्यास
सदरचे साहित्य कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी नाशिक
विभागीय मंडळ कार्यालयातून
आपणास स्वखर्चाने स्विकारावे लागेल याची
नोंद घ्यावी. असे विभागीय
सचिव,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक
व उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळ,
नाशिक विभागीय मंडळ नाशिक
422 001 यांनी
कळविले आहे.
* * * * *
जळगांव येथे डाक विभागाची पेन्शन अदालत
जळगांव, दि.
1 - जळगांव
डाक विभागातर्फे सेवानिवृत्त झालेल्या डाक कर्मचा-यांच्या पेन्शन विषयी तक्रारी समजुन घेण्यासाठी
येत्या 25 जून
2012 रोजी सकाळी 11 वाजता
पेन्शन अदालत डाक
अधिक्षक जळगांव विभाग जळगांव
यांचे कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
जळगांव डाक विभागातील सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या पेन्शन विषयीच्या ज्या तक्रारींचे
निवारण 6 आठवडयांच्या
आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले
नसेल अशा तक्रारींची
या पेन्शन अदालत मध्ये
दखल घेतली जाईल
असे टपाल खात्याच्या
पत्रकात नमूद करण्यात
आले आहे.
अधिक माहितीसाठी डाकघर
अधिक्षक जळगांव यांचेकडे संपर्क साधावा व आपली
तक्रार दयावी असे
अधिक्षक डाकघर जळगांव यांनी कळविले
आहे.
* * * * *
गिरणा प्रकल्पातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन
जळगांव, दि.
1 - गिरणा
पाटबंधारे विभाग,
जळगांवच्या अधिपत्याखालील गिरणा प्रकल्पातून
टंचाई निवारणार्थ पिण्याच्या पाण्याकरिता जामदा डावा, जामदा
उजवा व निम्न
गिरणा कालव्याच्या मर्यादित लांबीपर्यत (सा.क्र.25200
मी. पर्यत) पाण्याच्या उपलब्धतेनुसार आवर्तन सोडण्याचे नियोजित आहे. सदरील
पाणी सिंचनाकरिता उपलब्ध होवू शकणार
नाही,
याची नोंद घ्यावी.
सिंचनासाठी पाण्याचा वापर केल्यास
सिंचन कायदा 2005 मधील
तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल,
याची सर्वानी नोंद घ्यावी
व टंचाई काळात
जलसंपदा खात्यास सहकार्य करावे असे
कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे
विभाग जळगांव यांनी एका
पत्रकाव्दारे कळविले आहे.
* * * * *
No comments:
Post a Comment