Tuesday, 12 June 2012

वडगांव बु. येथे मृत झालेला मोर विषप्रयोगाने नव्हे तर उष्माघाताने दगावल्याचा वन विभागाचा खुलासा


जळगांव, दि. 12 :-  वडगांव बु. येथील गट. नं.439 शेती शिवारात दि. 17 मे 2012 रोजी अंदाजे दोन वर्षे वयाचा मोर मृत अवस्थेत आढळून आला होता. वनपाल अडावद वनरक्षक उनपदेव यांनी सदरच्या मोरास औषध उपचाराकरिता अडावद येथील पशुवैदयकीय अधिकारी यांचेकडे नेले असता त्यांनी मोराची तपासणी करुन तो मृत झाल्याचे घोषित केले. त्यानंतर दि. 18 मे 2012 रोजी पशुवैदयकीय अधिकारी यांनी मोराचे शवविच्छेदन करुन शवविच्छेदनाचा अहवाल त्याच दिवशी दिला त्या अहवालात मोराचा मृत्यु उष्माघाताने झाला असल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती उपवनसंरक्षक, यावल वनविभाग, जळगांव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
     सदरच्या घटनेबाबत दि. 18 मे 2012 च्या दै. देशदूत दै. सामना मध्ये`` मोरांवर विषप्रयोग करणारी टोळी सक्रीय`` `` विषप्रयोगाने मोराचा मृत्यु ``असे वृत्त प्रसिध्द झालेले होते. त्या विषयीचा वन विभागाने खुलासा सादर करुन मोराचा मृत्यु विषप्रयोगाने नव्हे तर उष्माघाताने  झाले असल्याचे स्पष्ट केलेले आहे.
     तसेच उनपदेव येथील शासकीय विश्रामगृह परिसरात ठेवलेल्या मृत मोराच्या पाहाणीत मोराच्या शरीरावर जख्म, रक्तश्राव अथवा शारिरिक नुकसान झाल्याचे दिसून आले नाही. त्या प्रमाणेच सदरच्या घटनेची चौकशी केली असता शेत मालक यांनी सांगितले की, दि. 17 मे 12 रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास शेतात काम करत असतांना शेताच्या बाजूला असलेल्या उंच टेकडीवरुन मोर गरबडत खाली पडला तदनंतर मिळालेल्या माहितीन्वये  वन विभागाच्या    कर्मचा-यानी मोरास अडावद पशुवैदयकीय दवाखान्यात नेले असता तेथील पशु वैदयकीय अधिका-यांनी मोर मृत झाल्याचे सांगितले. त्यानंतर केलेल्या शवविच्छेदनात मोराचा मृत्यु उष्माघाताने झाला असल्याचे अहवालात नमूद केलेले आहे.  
0  0  0  0  0

No comments:

Post a Comment