जळगांव, दि.
7 :- नाशिक
विभाग शिक्षक मतदार संघातून
महाराष्ट्र विधानपरिषदेसाठी एका सदस्याची
निवडणूक घ्यावयाची आहे. नामनिर्देशन
पत्रे उमेदवाराला किंवा त्याच्या
कोणत्याही प्रस्तावकाला निवडणूक निर्णय अधिका-यांकडे किंवा जिल्हाधिकारी
जळगांव तथा सहाय्यक
निवडणूक निर्णय
अधिकारी यांचेकडे शुक्रवार दिनांक 15 जून, 2012
पर्यंत (सार्वजनिक
सुट्टी व्यतिरिक्त) अन्य कोणत्याही
दिवशी सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत
त्यांच्या दालनात सुपूर्द करता येतील.
नामनिर्देशन पत्रे
उपरोक्त ठिकाणी व उपरोक्त
वेळेत मिळू शकतील, नामनिर्देशन पत्रांची छाननी विभागीय
आयुक्त यांचे दालन, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक
रोड, नाशिक
येथे शनिवार, दि.
16 जून, 2012 रोजी
सकाळी 11.00 वाजता
करण्यात येईल. उमेदवारी
मागे घेण्याबद्दलची सूचना उमेदवाराला
किंवा उमेदवाराने लेखी प्राधिकृत
केलेल्या त्यांच्या कोणत्याही सूचकाला किंवा निवडणूक
प्रतिनिधीला वरील परिच्छेद
(2) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अधिका-यांकडे त्यांच्या कार्यालयात सोमवार, दि.
18 जून, 2012 रोजी
दुपारी 3.00 वाजेपावेतो
देता येईल. निवडणूक
लढविली गेल्यास सोमवार, दि.
2 जुलै 2012
रोजी सकाळी 8.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यत
मतदान घेण्यात येईल असे
निवडणूक निर्णय अधिकारी, नाशिक
विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक - 2012 तथा
विभागीय आयुक्त, नाशिक
विभाग, नाशिक
यांनी एका प्रसिध्दी
पत्रकाव्दारे कळविले आहे.
* * * * * * * *
आदर्श आचार संहिता अंमलबजावणी साठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती
जळगांव,
दि. 7:- महाराष्ट्र
विधान परिषद नाशिक
विभाग शिक्षक मतदार संघासाठी
भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 जून
2012 रोजी सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर घोषीत
केलेला आहे. सदर
निवडणूकीचे कामकाज सुरळीतपणे पार पाडणेसाठी
जिल्हाधिकारी व जिल्हा
निवडणूक आधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांनी महाराष्ट्र
विधान परिषद नाशिक
विभाग शिक्षक मतदार संघ
यांच्या सहाय्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांची
सेवा दिनांक 7 जून
2012 पासून पुढील आदेश होईपावेतो
अधिग्रहीत करीत आहे.
या निवडणुकीसाठी भारत निवडणुक
आयोगाने दिनांक 1 जून
2012 पासून आदर्श आचार संहिता
लागू केलेली असून त्यासाठी
खालील अधिकारी व कर्मचारी
यांच्या सेवा आदर्श
आचार संहितेचा भंग होवू
नये किंवा आलेल्या
तक्रारीचे निवारण करण्यासाठी नेमणूका करण्यात आल्या आहेत.
पी.डी. कोचूरे उप जिल्हाधिकारी (महसूल),
संदिप भोसले गृहशाखा, सुयोग कुळकर्णी लिपिक गृहशाखा
व मदन काळे
गृहशाखा यांच्या आदर्श आचार
संहिता कक्षासाठी नेमणूक करण्यात आली आहे
असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, महाराष्ट्र
विधान परिषद नाशिक
विभाग शिक्षक मतदार संघ
तथा जिल्हाधिकारी , जळगांव
यांनी एका प्रसिध्दी
पत्रकाव्दारे कळविले आहे.
* * * * *
No comments:
Post a Comment