जळगांव,
दि. 14 :- शासनाच्या
समाज कल्याण विभागामार्फत चालविण्यात येणारी अनु. जाती
व नवबौध्द मुलांची शासकीय निवाशी शाळा चाळीसगांव
येथे अनु. जाती
व नवबौध्द विद्यार्थ्यांसाठी धुळे रोड, डेराबरडी
येथे अंध शाळेजवळ
सन 2012 मध्ये
सुरु करण्यात आली असून
सदर शाळेत अनु-जाती
व नवबौध्द विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरु
आहे.
सदर निवाशी शाळेमध्ये इयत्ता 5 वी ते 7 वी पर्यंत प्रवेशित विद्यार्थ्याना शासनामार्फत मोफत निवास, भोजन, क्रमीका
पुस्तके व शैक्षणिक
साहीत्य इ. सुविधा
पुरविण्यात येतात. तरी गरजू
विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक,
अनु.जाती व नवबौध्द
मुलींची शासकीय निवासी शाळा चाळीसगांव
येथे व शासकीय
मुलींचे वसतिगृह चाळीसगांव येथे संपर्क
साधावा असे मुख्याध्यापक
अनुसुचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा चाळीसगांव
यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये कळविले आहे.
0
0 0 0 0
No comments:
Post a Comment