जळगांव, दि.
5 - राज्याचे कृषि,
परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव
जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर हे जिल्हा दौ-यावर येत असून
त्यांचा दौरा कार्यक्रम
पुढीलप्रमाणे -
गुरुवार दिनांक 7
जून,
2012 सकाळी 8.25
वाजता 11039 डाऊन
महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगांव रेल्वे स्थानक येथे आगमन
व मधुबन बंगल्याकडे
प्रयाण सकाळी 8.35 वाजता
मधुबन बंगला येथे
आगमन व राखीव.
* * * * * *
रावेर येथील मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात प्रवेश
जळगांव, दि.
5 :- मागासवर्गीय
मुंलाचे शासकीय वसतिगृह,
रावेर येथे सन 2011-12
पासून सुरु असुन
शालेय व महाविदयालयीन
विभागातील अनु,
जाती अनु. जमाती, विमुक्त
जाती भटक्या जमाती,
विशेष मागासप्रवर्ग या प्रवर्गातील
विदयार्थ्यांना सर्व सोईनी
व विनामुल्य असे इयत्ता
8 वी, 11 वी आणि प्रथम वर्ष
कला,
वाणिज्य , विज्ञान
या वर्गात प्रवेशासाठी अर्ज भरण्यात
येत असून गरजू
व पात्र विदयार्थ्यांनी कार्यालयीन वेळेत 10 ते 5.45
शासकीय सुटृयांचे दिवस
सोडून निकाल लागल्या
पासून 15 दिवसाचे
आत अर्ज करावे
असे विशेष जिल्हा
समाज कल्याण अधिकारी जळगांव यांच्या वतीने गृहपाल
मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह रावेर,
जि. जळगांव हे कळवितात
अधिक माहितीसाठी गृहपाल
मागासवर्गीय मुंलाचे शासकीय वसतिगृह,
रावेर येथे विप्राश्रम
प्लॉट न. 30 रोकडे
हनुमान मंदीराजवळ,
तिरुपती नगर सावदा
रोड रावेर जि.
जळगांव या पत्यावर
संपर्क साधावा असे गृहपाल
मागासवर्गीय मुलांचे शासकीय वस्तीगृह रावेर यांनी
एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
* * * * * *
No comments:
Post a Comment