Saturday, 2 June 2012

पालकमंत्री ना. देवकर यांचा जळगांव जिल्हा दौरा


जळगांव, दि. 2 -  राज्याचे कृषि, परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर हे जिल्हा दौ-यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे -
     रविवार, दिनांक 3 जून, 2012 - सकाळी 6.15 वा. दादर अमृतसर एक्सप्रेसने जळगांव रेल्वे स्टेशन येथे आगमन मोटारीने मधुबन बंगल्याकडे प्रयाण, सकाळी 6.30 वा. मधुबन बंगला येथे आगमन राखीव, सकाळी 9.00 वा. वसंतवाडी एम.एस.ई.बी. सबस्टेशनाचे उदघाटन, सकाळी 9.30 वा. विटनेर साठवण बंधारा भुमिपूजन कार्यक्रम, सकाळी 10.00 वा. वावडदा 1 2 साठवण बंधा-यांचे भुमिपूजन कार्यक्रम, सकाळी 10.30 वा. डोमगांव साठवण बंधारा भुमिपूजन कार्यक्रम, सकाळी 11.15 वा. जवखेडा साठवण बंधारा भुमिपूजन कार्यक्रम, दुपारी 12.00 वा. वराड साठवण बंधारा भुमिपूजन कार्यक्रम, दुपारी 12.30 वा. पाथरी केटीवेअर टाईप बंधा-यांचे भुमिपूजन, दुपारी 1.00  ते 2.00  राखीव (पाथरी येथे), सायं 4.00 वा. लोकमतच्या प्रॉपटी एक्झीबिशनला भेट, स्थळ - खान्देश सेंट्रल हॉल, जळगांव. सायं - 5.00 ते 6.00 पद्यमालय शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी , सायं. 7.00 वा. वराड ता. धरणगांव येथे बैठक, रात्री 8.00 वा. जळगांवकडे प्रयाण, रात्री 8.30 वा. जळगांव येथे आगमन मुक्काम,
सोमवार दिनांक 4 जून, 2012 सकाळी 9.00 ते 9.30 वा. शासकीय विश्रामगृह येथे अभ्यागताच्या गाठीभेटीसाठी राखीव, सकाळी 10.00 वा. म.रा.मा.प.महामंडळाच्या जळगांव विभागातील धरणगांव बसस्थानकाचे उदघाटन कार्यक्रम, स्थळ : नुतन बसस्थानक , धरणगांव, दुपारी 12.00 वा. म.रा. मा.प. महामंडळाच्या जळगांव विभागातील पाळधी बसस्थानकाचे उदघाटन कार्यक्रम स्थळ :- नुतन बसस्थानक , पाळधी, दुपारी 1.00 ते 2.00 वा. राखीव (जळगांव), दुपारी 2.00 ते 6.00 वा. मतदार संघातील विविध गावांना भेटी, सायं. 6.00 ते 8.00 वा. अभ्यागतांच्या गाठीभेठी रात्री 11.40 वा. 12106 अप विदर्भ एक्सप्रेसने मुबंई सी.एस.टी. कडे प्रयाण.
मंगळवार, दिनांक 5 जून , 2012 सकाळी 6.40 वा. सी.एस.टी रेल्वे स्टेशन येथे आगमन बी-2 बंगल्याकडे प्रयाण सकाळी 6.50 वा. शासकीय निवासस्थान ब- 2 बंगला येथे आगमन.

*  *  *  *  *
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कॅम्पस इन्टरव्हयू

जळगांव, दि. 2:-  दिनांक   11 जून 2012 रोजी मे. इनरकॉन इंडीया लि. दमण या कंपनीचे  प्रतिनिधी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण जळगांव या ठिकाणी कॅम्पस इन्टरव्हयूसाठी येत आहेत तरी फिटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॅानिक्स, मेकॅनिक, व्यवसाय उत्तीर्ण उमेदवारांनी दिनांक 11 जून 2012 रोजी मेस हॉल, शासकीय आय टी आय जळगांव येथे सकाळी 9.00  वाजता आवश्यक कागदपत्रे घेवून स्वखर्चाने हजर रहावे. असे प्राचार्य मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंन्द्र औद्योगिक प्रशिक्षण संस्था जळगांव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*  *  *  *  *

No comments:

Post a Comment