जळगांव,
दि. 8 - राज्याचे कृषि,
परिवहन राज्यमंत्री तथा जळगांव
जिल्हयाचे पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर हे जिल्हा दौ-यावर येत असून
त्यांचा दौरा कार्यक्रम
पुढीलप्रमाणे -
शनिवार,
दिनांक 9 जून, 2012 सकाळी
10.00 वा.
जळगांव येथे राखीव
दुपारी 2.00 वाजता
शासकीय मोटारीने औरंगाबाद नगर मार्गे
पुणे कडे प्रयाण, रात्री
9.00 वा. पुणे न्यु सर्कीट
हाऊस येथे आगमन
व मुक्काम.
* * * * * *
शिकाऊ उमेदवारांच्या व्यवसाय परिक्षेचा निकाल 12 जूनला
जळगांव,
दि.8
:- शिकाउ उमेदवारी अधिनियम 1961 अंतर्गत
शिकाउ उमेदवारांच्या मे - 2012 मध्ये
झालेल्या 96 व्या
आखिल भारतीय व्यवसाय परीक्षेचा निकाल दिनांक
12 जून 2012
रोजी घोषित होणार
आहे याची उमेदवारांनी
नोंद घ्यावी.
अनुत्तीर्ण उमेदवारांचे परीक्षा फॉर्म दिनांक
22 जून 2012
पर्यंत भरले जातील
असे अशंकालीन प्राचार्य यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
* * * * * *
No comments:
Post a Comment