जळगांव,
दि. 4 - केंद्र
शासनाकडून बाल कल्याण
क्षेत्रातील कार्यासाठी पुरस्कार देण्यात येतात. त्याबाबतची माहिती पुढील प्रमाणे
आहे.
राजीव गांधी
मानव सेवा पुरस्कार
- बालविकास ,
बाल संरक्षक व बाल
कल्याण या क्षेत्रात
10 वर्षापेक्षा जास्त कालावधीत विशेष योगदान
असणा-या व्यक्तींना सदर पुरस्कार
देण्यात येतो राष्ट्रीय
बाल कल्याण पुरस्कार - बाल
कल्याण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या
व्यक्ती व संस्थाना
त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्याचे
दृष्टीने केंद्र शासनामार्फत राष्ट्रीय बाल कल्याण
पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
विशेष नैपुण्या
पुरस्कार -
शैक्षणिक,
सांस्कृतिक,
कला व क्रिडा
या क्षेत्रामध्ये विशेष नैपुण्य
अथवा प्राविण्य मिळविणा-या 4 ते 15
वर्ष वयोगटातील मुलामुलींना विशेष नैपुण्य
राष्ट्रीय बाल पुरस्कार
देण्यात येतो.
पात्र उमेदवारांनी विहीत नमुन्यातील प्रस्ताव या कार्यालयास
चार प्रतीत इंग्रजीमध्ये
दि. 12 जून
2012 पूर्वी सादर करावा. अधिक माहिती
व विहित नमुन्यासाठी
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, दुसरा
मजला,
मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,
आकाशवाणीजवळ,
जळगांव दूरध्वनी क्र. 2228828 येथे
संपर्क साधावा किंवा केंद्र
शासनाच्या www.wcd.nic.in या संकेत स्थळावर अधिक माहितीकरीता
भेट द्यावी असे जिल्हा
महिला व बालविकास
अधिकारी जळगांव यांनी एका
प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
* * * * * *
शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार व शिष्यवृत्ती धनादेश घेऊन जावेत
जळगांव, 4 :- जळगंाव
जिल्हयातील सर्व कनिष्ठ महाविद्यालय
व माध्यमिक शाळाच्या प्राचार्य व मुख्याध्यापक
यांना या जाहिर
प्रसिध्दीव्दारे कळविण्यात येते की, ज्या
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शाहु महाराज
गुणवत्ता पुरस्कार सन 2011 - 12 व शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्तीचे सन 2010 - 11 चे प्रस्ताव या कार्यालयास सादर केलेले
होते त्या विद्यार्थ्यांचे धनादेश या कार्यालयात तयार असुन
संबंधीत प्राचार्य किंवा मुख्याध्यापक
यांनी तात्काळ या कार्यालयातुन
घेऊन जावे.
तसेच सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती विजाभज / विमाप्र
चे धनादेश सुध्दा या कार्यालयात
तयार असुन संबंधीत
मुख्याध्यापक यांनी सदरचे
धनादेश या कार्यालयातुन
घेऊन जावे सदरची
रक्कम विद्यार्थ्यांना त्वरीत वाटप करावी
असे आवाहन श्री.
व्ही ए. पाटील, सहाय्यक
आयुक्त, समाज कल्याण, जळगांव
यांनी एका प्रसिध्दी
पत्रकान्वये केले आहे.
* * * * * *
No comments:
Post a Comment