चाळीसगांव दि. 21 : तालुक्यातील
पंचायत समिती,
ग्रामपंचायत विभाग,
आरोग्य विभाग,
ग्रामीण पाणी पुरवठा
विभाग व जिल्हा
परिषद जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी गुणवत्ता
सनियंत्रण व सर्व्हेक्षणासाठी तालुकास्तरीय कार्यशाळा आज परदेशी
बोर्डींग हॉल,
लक्ष्मी नगर येथे
संपन्न झाली.
या कार्यशाळेस गटविकास अधिकारी श्री. अशोक
पटाईत,
जळगांव जिल्हा साथरोग नियंत्रण अधिकारी श्री. वाभळे, तालुका
वैद्यकीय अधिकारी डॉ. तानाजी
चव्हाण,
श्री. वानखेडे आदी मान्यवर
व्यासपिठावर उपस्थित होते.
तालुका आरोग्य अधिकारी श्री. चव्हाण
म्हणाले की,
पिण्याचे पाणी,
परिसर स्वच्छता आणि वैयक्तिक
स्वच्छता या गोष्टींचा
आरोग्याशी खूप जवळचा
संबंध आहे. व्यक्तिगत
सवयी व सार्वजनिक
अस्वच्छता,नळपाणी
पुरवठा यंत्रणेतील दोष यांमुळे
पाणी दुषित होऊन
ते पाणी पिण्यास
वापरल्याने अतिसार,
कॉलरा,
विषमज्वर,
कावीळ इ. जलजन्य
रोगांचा प्रसार होतो. त्यामुळे
अशा रोगांचे रुपांतर साथीच्या स्वरुपात होते. या रोगांना आळा घालण्यासाठी
नागरिकांनी पिण्याचा पाण्याचा परिसर स्वच्छ
ठेवणे व पाणी
अशुध्द होऊ नये
याची काळजी घेणे
आवश्यक आहे.
श्री. वानखेडे
म्हणाले की,
गावातील सर्वांना शुध्द,सुरक्षित
व पुरेसा पाण्याचा पुरवठा करणे हे ग्रामपंचायतीचे आद्य कर्तव्य
आहे. दैनंदिन पाणी शुध्दीकरण
करणे,
टी. सी.एल. पावडरचा साठा व्यवस्थित
ठेवणे व दैनंदिन
वापर करणे,
दररोज निरनिराळया ठिकाणी ओ.टी टेस्ट
घेऊन त्याची दैनंदिन नोंद ठेवणे, गावातील
पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे नियमित सर्वेक्षण करुन स्त्रोतांची
माहिती अद्यावत ठेवणे व स्त्रोतांची स्वच्छता राखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी. तसेच दुषित
पाण्याच्या दुष्परिणांमाचे विविध उदाहरणे
देऊन त्यावरील उपयोजनांबाबत सविस्तर माहिती दिली. नागरिकांना
शुध्द पाण्याचे पाणी मिळावे
व साथीच्या रोगास आळा
बसावा यासाठी पाणी गुणवत्ता
सनियंत्रण,
सर्वेक्षण व माहिती
व्यवस्थापन पध्दती यावर उपस्थितांना
सखोल मार्गदर्शन केले.
सर्व विभागातील
अधिकारी,
कर्मचा-यांनी समन्वयाने कामे करावीत
असे सांगून श्री. पटाईत
यांनी तालुक्यातील गावांचा दुषित पाण्यासंबंधी
केलेल्या उपाययोजनांबाबत सविस्तर आढावा घेतला.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक विस्तार अधिकारी श्री. पी.
एस. सोनवणे यांनी केले
तर सुत्रसंचालन ग्रामपंचायतचे विस्तार अधिकारी श्री. एस.
एस. कठाळे यांनी
केले.
या कार्यशाळेस
तालुक्यातील सर्व प्राथमिक
आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी,
कनिष्ठ अभियंता (ग्रा.पा.पु.),
विस्तार अधिकारी पंचायत समिती,
आरोग्य पर्यवेक्षक,
आरोग्य सहाय्यक,
आरोग्य सेवक,
ग्राम विकास अधिकारी, ग्राम
सेवक,
जलसंरक्षक (वॉटरमन),
गटसंसाधन केंद्रातील गटसमन्वयक आदी उपस्थित
होते.
*
* * * * *
No comments:
Post a Comment