जळगांव,
दि. 4 :- जिल्हयातील
जामनेर,
पारोळा,
एरंडोल,
भुसावळ,
भडगांव,
पाचोरा,
अंमळनेर,
आणि जळगांव तालुक्यातील 36 गांवानां
असलेल्या पाणी टंचाई
निवारणार्थ 31 टॅकरव्दारे
पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
यात 7 शासकीय
टॅकर असून उर्वरीत
खाजगी टॅकरव्दारे पाणी पुरवठा
सुरु आहे.
टॅकरव्दारे पाणी पुरवठा
करण्यात येत असलेली
तालुकानिहाय गांवे जळगांव,असोदा,खिर्डी,
आणि देव्हारी,
जामनेर पहुर कसबे, कर्णफाटा
कर्जाणे,
पहुर पेठ,
टाकळी बु// टाकळी
खु // पिंपळगांव
गोलाईत,
शंकरपुरा,
हरिनगर,
वाकोदवाडी शिंगाईत,
पिंपळगांव बु,
पिपरखेडा,
कोदोली बु// मालदाभाडी, एकुलती
,खु// एकुलती
बु.// एरंडोल आडगांव तांडा. भुसावळ पिंप्रीसेकम,
कपिलवस्तु नगर. भडगांव पेडगांव, पाचोरा चिंचखेडा, अंमळनेर कचरे, कावपिंप्री, जानवे, डांगरे, पारोळा चहुत्रे, लोणी
सीम मोंढाळे,
पळासखेडे,
हनुमंतखेडे,
चोरवड अशा एकूण
38 गावांमध्ये 31
टँकंरव्दारे पाणी पुरवठा
सुरु आहे.
पाणीटंचाई निवारणर्थ 126 गावांतील
129 विहीर अधिग्रहीत करण्यात आलेल्या आहेत. 12 गावांतील
11 तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत
करण्यात आलेल्या आहेत. तसेच
124 गावांमध्ये 199
नवीन विंधण विहीरी
17 गावांमध्ये 19
नवीन कुपनलिका,
22 विहिरींचे खोलीकरण 6 गावांतील
नळ पाणीपुरवठ योजना दुरुस्त
करण्यात आलेल्या आहेत.
* * * * * *
जागतिक पर्यावरण दिन निमीत्त विविध कार्यक्रम
जळगांव, दि.
4 :- संपूर्ण
विश्वात जागतिक पर्यावरण दिन जून
5 रोजी साजरा केला जातो.
संपूर्ण विश्वातील दळणवळणातील वाढता पसारा, वाढते
औद्योगिकीकरण,
त्यापसून निर्माण होणारे प्रदूषणासारखे गंभीर प्रश्न
याबाबत सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 1972 सालापासून
हा दिवस युनायटेड
नेशन हन्हायर्नमेंट प्रेाटेक्शन या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या पुढाकाराने जागतिक पर्यावरण दिन म्हणून
साजरा केला जातो.
या वर्षी युनायटेड
नेशन एन्हायर्नमेंट प्रोटेक्शन या आंतरराष्ट्रीय संस्थेने हरित अर्थव्यवस्थेत आपला समावेश
आहे का ? (Green
Economy ;Does it inclide you) हे घोषवाक्य आंतरराष्ट्रीय स्तरावर जाहीर केले
आहे. मप्रनि मंडळातर्फे जळगांव जिल्हयातील सर्व स्थानिक
स्वराज्य संस्था,
शैक्षणिक संस्था,
औद्योगिक घटक,
सामाजिक स्वयंसेवी संस्था,
पर्यावरणप्रेमी इत्यादिन मार्फत जागतिक पर्यावरण दिन 5 जून
2012 रोजी राबवून पर्यावरण विषयक कार्यक्रमांचे आयोजन जून अखेर पर्यत
करुन महिनाभर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत
त्यात प्रामुख्याने
वृक्षारोपण, वृक्षदिंडी , प्रदूषण
कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना, जल साधन संपत्तीचे काळजीपुर्वक व्यवस्थापन,
जैविक विविधतांचे संरक्षण,
वनस्पती,
प्राणी,
जमिनी इत्यादींचे संरक्षण व संवर्धन, जल व हवा ( सुधारित
दर्जाच्या ) यांचे
संनियंत्रण तथा उपाय
व योजनात्मक कार्यवाही,
स्वच्छ / शुध्द
उत्पादने,
पृथ्वीवरील साधन संपत्तीचा
योग्य वापर व त्यांचे संवर्धन,
पर्यावरण संरक्षाणात्मक प्रकल्पांना प्रोत्साहन देणे,
प्रदूषणाबाबत व्याख्याने आयोजित करणे,
चर्चासत्र घडविणे,
निबंध स्पर्धा आयोजित करणे,
पर्यावरण विषयक जनजागृती
निर्माण करणारे व मार्गदर्शक ठरविणारे माहितीदर्शक तक्ते,
भित्तीपत्रके,
पोस्टर्स,
घोषवाक्ये फलक इ. मांडावेत,
कारखाना प्रक्रिया परिसर नागरी
वस्तीत तसेच सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणा परिसर स्वच्छता
अभियान राबवावे,
रोप वाटिका उभारणीस प्रोत्साहण करणे,
घातक घन कच-याची
विल्हेवाट लावणे,
तसेच राखेची,
जैव वैद्याकीय व अत्यंत
घातक अशा 50 मायक्रॉन
पेक्षा कमी जाडीच्या
प्लॅस्टिक पिशव्या इत्यादीचे संपूर्ण निर्मूलन व त्या
विषयीचे उपयुक्त माहिती दर्शक तक्ते
किंवा पोस्टर्स माडण्यात येणार आहेत
असे उप प्रादेशिक
अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ , जळगांव-
1 यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वे कळविले आहे.
* * * * * *
नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या
निवडणूकीमुळे जिल्हयात आदर्श आचार संहिता लागू
जळगांव,
दि. 4 :- भारत
निवडणूक आयोग दिल्ली
यांनी दिनांक 1 जून
2012 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेची नाशिक विभाग
शिक्षक मतदार संघाची
व्दिवार्षिक निवडणूक 2012 ची घोषणा केलेली असून या तारखेपासून सदर निवडणूकीची
आदर्श आचार संहिता
संपूर्ण जळगांव जिल्हयात सुरु झालेली
आहे.
दि. महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ डिफेसमेंट
ऑफ प्रॉपर्टी ऍ़क्ट 1995 व माननीय भारत निवडणूक
आयोग,
दिल्ली यांनी वेळोवेळी
निर्गमीत केलेले आदेश व निर्देश यानुसार विना परवाना
खाजगी अथवा सार्वजनिक
मालमत्तेवर पोस्टर्स लावणे,
घोषणा लिहिणे,
निवडूक चिन्हे लिहिणे,
कापडी फलक लावणे, झेडे
लावणे व इतर
कारणाने सदर मालमत्ता
विद्रुपित करणेवर बंदी घातलेली
आहे.
अशा प्रकारे ज्या राजकीय पक्ष / उमेदवाराने
खाजगी अथवा सार्वजनिक मालमता
विद्रुपित केली असेल
त्यांनी अशी पोस्टर्स, भित्ती
पत्रके,
घोषणा,
झेडे,
कापडी फलक,
व चिन्ह इ. काढून टाकण्याची तातडीने व्यवस्था करावी.
दि. महाराष्ट्र प्रिव्हेशन ऑफ डिफेसमेन्ट
ऑफ प्रॉपटी ऍ़क्ट 1995 अन्वये
अशा प्रकारे मालमत्ता विद्रुपित केल्यास 3 महिन्यापर्यत
तुरुंगवास अथवा दोन
हजार रुपयांपर्यत दंड अथवा
दोन्ही शिक्षेस संबंधित इसम पात्र
राहील असे सहाय्यक
निवडणुक निर्णय अधिकारी महाराष्ट्र विधानपरिषद नाशिक विभाग
शिक्षक मतदार संघ
तथा जिल्हाधिकारी जळगांव यांनी एका
प्रसिध्दी पत्रकव्दारे कळविले आहे.
* * * * * *
No comments:
Post a Comment