Thursday, 17 May 2012

मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहात प्रवेश सुरु


जळगांव, दि. 16 :- शासनाच्या सामाजिक न्याय (समाज कल्याण) विभागा मार्फत अधिक्षीका, मागासवर्गीय (नवनिर्मीत) मुलींचे शासकीय वस्तीगृह, अंमळनेर, बस स्टॅडच्या पाठी मागे, दुर्गा हॉस्पीटल जवळ देखमुख बंगला , अंमळनेर जि. जळगांव सन 2012-13 या शैक्षणिक वर्षासाठी आर्थिक दृष्टया मागासवर्ग, अपंग, अनाथ, अनु.जाती, अनु. जमाती, वि.जा.भ.ज. विशेष मागास प्रवर्ग इ. प्रवर्गातील विदयालय विभागातील महाविदयालय विभागातील गरजू विदयार्थीनि साठी प्रवेश अर्ज मागविणेत येत आहे. या प्रवर्गातील जागेसाठी विदयालय महाविदयालय विभागा करिता छापील अर्ज विनामुल्य  वाटप सुरु आहे. सदर अर्ज अधिक्षका, मागासवर्गीय (नव निर्मिती) मुलींचे शासकीय वसतिगृह अंमळनेर बस स्टॅड मागे, दुर्गा हॉस्पीटल जवळ, देशमुख बंगला, अंमळनेर येथे उपलब्ध आहे. वसतिगृह प्रवेश त्या त्या प्रवर्गातील राखीव जागेवर गुणवत्ते नुसार दिला जातो. प्रवेशीतांना वसतिगृहा मार्फत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, पुस्तके, निर्वाह भत्ता इ. सोयी सुविधा विनामुल्य पुरविल्या जातात तरी गरजू विदयार्थांनी प्रवेश अर्जा साठी संपर्क साधावा.
अर्जा सोबत गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला,   दोन पासपोर्ट फोटो आर्जास लावणे घरचा टेलीफोन क्र. असणे आवश्यक आहे,

* * * * *

                                      अमळनेर शासकीय वस्तीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु
    जळगांव, दि.16:- शासनाच्या सामाजिक न्याय (समाज कल्याण) विभागा मार्फत कार्यरत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह अंमळनेर जि. जळगांव सन 2012-13 या शैक्षणिक वर्षासाठी अनु.जाती, अनु. जमाति, वि.जा. भ.ज. आर्थिक दृष्टया मागासवर्ग, अनाथ, अपंग इ. प्रवर्गातील विदयालय, महाविदयालय विभागातील गरजू विदयार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज मागविणेत येत आहे. या प्रवर्गातील जागासाठी विदयालय विभाग महाविदयालय विभागा करिता छापील अर्ज विनामुल्य वाटप सुरु आहे. सदर अर्ज डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुंलाचे शासकीय वसतिगृह अंमळनेर   जि. जळगांव येथे उपलब्ध आहेत प्रवेश त्या त्या प्रवर्गातील जागेवर गुणवत्ते नुसार दिला जातो.
     प्रवेशितांना वसतिगृहा मार्फत निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य, पुस्तके निर्वाह भत्ता इ. सोयी सुविधा विनामुल्य पुरविल्या जातात तरी गरजू विदयार्थ्यांनी प्रवेश अर्जासाठी संपर्क साधावा. अर्जा सोबत गेल्या वर्षाचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, दोन पास पोर्ट फोटो, अर्जा सोबत अर्जावर घरचा टेलीफोन क्रमांक स्वत:चा टेलीफोन क्रमांक असणे आवश्यक आहे.
* * * * *

No comments:

Post a Comment