औद्योगिक प्रशिक्षण संस्था एरंडोल येथे ३० जून पर्यंत
ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज सादर करावे
जळगाव, दिनांक २४ जून, 2024 ( जिमाका वृत्तसेवा ) : सर्व नागरीकांना व युवकांना कळविण्यात येते की, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय आयटिआय एरंडोल जिल्हा जळगाव येथे केंद्रिय ऑनलाईन पध्दतीने प्रवेश प्रक्रिया २०२४ दिनांक ३ जून, २०२४ पासुन सुरु करण्यात आलेली असून इच्छुक उमेदवारांनी https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर भेट देवून ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज भरवेत. सद अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३० जून, २०२४ सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.
शासकीय आयटिआय एरंडोल येथे प्रवेश साठी कोपा, इलेक्ट्रिशियन, फिटर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मशिनिष्ट हे व्यवसाय उपलब्ध आहे. अधिक माहिती साठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था एरंडोल येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
00 00 00 00 00
No comments:
Post a Comment