Tuesday, 18 June 2024

खरीप-2024 साठी पीक विमा भरण्यास सुरुवात, एक रुपयात भरला जाणार पीक विमा

 खरीप-2024 साठी पीक विमा भरण्यास सुरुवात,
एक रुपयात भरला जाणार पीक विमा
- कृषीमंत्री धनंजय मुंडे

 मुंबई, दिनांक 18 जून, 2024 : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम - 2024 साठी पीक विमा भरण्याची सुरुवात आजपासून शासनाच्या https://www.pmfby.gov.in या संकेतस्थळाद्वारे करण्यात आली असूनयाही वर्षी शेतकऱ्यांना आपल्या अधिसूचित पिकांचा विमा भरण्यासाठी केवळ एक रुपया भरावा लागणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून मागील वर्षी विक्रमी 1 कोटी 70 लक्ष पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आपला पीकविमा भरून या योजनेत सहभाग घेतला होता.

शेतकऱ्यांनी आपला खरीपाचा पीकविमा 15 जुलै पूर्वी भरून घ्यावा

खरीप 2024 साठी भातज्वारीसोयाबीनकापूसतूरमूगउडीदमकाबाजरीनाचणीभुईमूगतीळकारळेकांदा ही 14 पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. तर या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत 15 जुलै असूनत्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून घ्यावाअसे आवाहन कृषीमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.

योजनेतील वैशिष्ट : विमा योजनेत समाविष्ट  पिके भात(धान)खरीप ज्वारीबाजरीनाचणी(रागी)मकातूरमुगउडीदसोयाबीनभुईमुगतीळकारळेकापूस व कांदा  या  १४   पिकांसाठी ,अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांना भाग घेता येईल. अधिसूचित क्षेत्रातअधिसूचित पिके घेणारे (कूळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. पीक कर्ज घेणाऱ्या आणि  बिगर कर्जदार शेतकऱ्यांना  योजनेतील सहभाग ऐच्छिक राहीलभाडेपट्टीने शेती  करणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे आवश्यक आहे.

 ई-पीक पाहणी :- शेतकऱ्याने लागवड केलेल्या पिकाची नोंद ई-पीक पाहणी  मध्ये करावी. आपल्या मालकीच्या नसलेल्या जमिनीवर विमा काढणेउदाहरणार्थ शासकीय जमीनअकृषक जमीनकंपनीसंस्थामंदिरमस्जिद  यांच्या जमीनीवर विमा काढल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल.

या योजनेत आपण जे पीक शेतात लावले आहे त्याचाच विमा घ्यावा. शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर आपणास विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागेल. यावर्षी भातकापूससोयाबीन  पिकांमध्ये महसूल मंडल मधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रीमोट सेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनास ४० टक्के भारांकन आणि पीक कापणी प्रयोगाद्वारे आलेल्या उत्पादनास ६० % भारांकन देऊन मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे.

अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहेपिक विम्यातील अर्ज हा आधार वरील नावाप्रमाणेच  असावापिक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते. यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे. याकरिता आपले बँक मॅनेजर माहिती देऊ शकतात आधार कार्डवरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असावेविमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी  विभागास  रुपये ४० मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. ते संबंधित विमा कंपनी मार्फत सीएससी विभागास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे रक्कम सीएससी चालकांना देणे अभिप्रेत आहे.

 विमा संरक्षणाच्या बाबी पुढीलप्रमाणे आहेत : पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घटपिक पेरणीपूर्व /लावणीपूर्व नुकसानहंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसानकाढणी पश्चात पिकाचे नुकसानस्थानिक नैसर्गिक आपत्ती मुळे नुकसान.

विमा योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्याने काय करावे?

अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांस देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. मात्र त्यासाठी शेतकऱ्याने विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान ७ दिवस संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणे बाबत लेखी कळवणे गरजेचे आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला ७/१२ चा उताराबँक पासबुकआधार कार्ड  व पिक पेरणीचे स्वयं घोषणापत्र  घेवून प्राधिकृत बँकेत किंवा  कॉमन सर्विस सेंटर (CSC) च्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता  किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता. योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत  १५ जुलै २०२४ आहे.

 सर्वसाधारण पीकनिहाय विमा संरक्षित रक्कमयात जिल्हानिहाय फरक संभवतो. 

भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम हेक्टरी रु.४०००० ते ५१७६०ज्वारी रु.२०००० ते ३२५००बाजरी रु १८,००० ते ३३,९१३नाचणी रु. १३७५० ते २००००मका रु ६००० ते  ३५५९८,  तूर रु २५००० ते ३६८०२मुग २०००० ते २५८१७उडीद रु. २०००० ते २६०२५भुईमुग रु. २९००० ते ४२९७१सोयाबीन रु. ३१२५० ते ५७२६७,  तीळ रु. २२००० ते २५०००कारळे रु. १३७५०कापूस रु. २३००० ते  ५९९८३कांदा रु. ४६००० ते ८१४२२.    

या योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन १४४४७संबंधित विमा कंपनीस्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

00 0 0 0 0 0 00

No comments:

Post a Comment