Wednesday, 5 June 2024

शिक्षक मतदार संघ; सहा नामनिर्देशन अर्ज दाखल

 शिक्षक मतदार संघ;
सहा नामनिर्देशन अर्ज दाखल

 

नाशिक, दिनांक 5 जून,2024 (विमाका वृत्तसेवा) :

महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी बुधवार दिनांक 5 जून,2024 रोजी  4 उमेदवारांनी 6 नामनिर्देशन अर्ज सादर केले असून आत्तापर्यंत 19 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत.


आज नामनिर्देशन अर्ज दाखल करणाऱ्यामध्ये गव्हारे पंडीत सुपडू, जळगाव यांनी अपक्ष म्हणून अर्ज सादर केला आहे. रतन राजलदास चावला, नाशिक यांनी अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे दोन अर्ज सादर केले आहेत. महेंद्र मधुकर भावसार, धुळे यांनी अपक्ष व नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी असे दोन अर्ज सादर केले आहेत. दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अर्ज सादर केला आहे.


महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी दिनांक 5 जून, 2024 रोजी एकही उमेदवाराने नामनिर्देशन अर्ज नेले नाहीत.

0 0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment