Wednesday, 12 June 2024

वांग मराठवाडी, उत्तर मांड मध्यम प्रकल्पबाधितांचे प्रश्न सोडविणार - मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

 वांग मराठवाडी, उत्तर मांड मध्यम प्रकल्पबाधितांचे प्रश्न सोडविणार
- मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

मुंबई दिनांक 12 जून, 2024 : वांग मराठवाडी आणि उत्तर मांड मध्यम प्रकल्पबाधितांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

            वांग मराठवाडी मध्यम प्रकल्प आणि उत्तर मांड मध्यम प्रकल्पामधील बाधित प्रकल्प ग्रस्तांच्या प्रश्नाबाबत आज मंत्रालयात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, मुख्य अभियंता डॉ. ह. तू. धुमाळमदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, पुणे विभागाच्या उपायुक्त (पुनर्वसन) पूनम मेहतासाताराचे अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडेतारळीचे कार्यकारी अभियंता राहुल धनवट यांच्यासह वांग मराठवाडी आणि उत्तर मांड मध्यम प्रकल्प येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

            मंत्री अनिल पाटील म्हणाले की, पाटण तालुक्यातील वांग मराठवाडी  मध्यम प्रकल्पातंर्गत अंशत: बाधीत गाव मौजे जिंती व निगडे प्रकल्पग्रस्तांच्या मागणीबाबतचा प्रस्ताव तसेच उत्तरमांड मध्यम प्रकल्पामुळे अंशत: बाधीत झालेल्या माथनेवाडी  येथील 46 घरांच्या पुनर्वसनाबाबतचा प्रस्ताव नव्याने सादर करण्यात यावा.

0 0 0 0 0 0 0 

No comments:

Post a Comment